आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रांती ज्योतीचे स्वागत‎:फुले दाम्पत्याचे कार्य समाज‎ माध्यमातून जगासमोर यावे‎

देऊळगावराजा‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले दाम्पत्य हे‎ शिक्षण क्षेत्रातील देवता आहेत. त्यांचे‎ जन्मस्थान नायगाव हे सर्वांचे शक्तिपीठ‎ आहे. क्रांति ज्योतीचा समता व‎ समानतेचा मंत्रच देशाला वाचवू‎ शकतो. तसेच फुले दाम्पत्याचे कार्य‎ समाज माध्यमातून जगासमोर यावे,‎ असे प्रतिपादन माजी नगराध्यक्ष तथा‎ अखिल भारतीय महात्मा फुले समता‎ परिषदेचे जिल्हाध्यक्ष संतोष खांडेभराड‎ यांनी केले.‎ ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या‎ जन्मदिनानिमित्त भारतीय माळी‎ महासंघ कर्मचारी संघटनेच्या वतीने‎ क्रांती ज्योत मातृतीर्थ सिंदखेडराजा‎ देऊळगावराजा मार्गे नायगाव येथे‎ काढण्यात आली.

२ जानेवारी रोजी‎ सकाळी नऊ वाजता मातृतीर्थ‎ सिंदखेडराजावरून देऊळगावराजा येथे‎ या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले‎ क्रांतीज्योतीचे आगमन झाले. यावेळी‎ बसस्थानक चौकात क्रांतीज्योतचे‎ स्वागत करण्यात आले. यावेळी‎ असंख्य जनतेने दर्शनाचा लाभ घेतला‎ पुढे बोलताना खांडेभराड म्हणाले की,‎ ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले जन्मदिन‎ सर्वत्र शिक्षण दिन म्हणून साजरा व्हावा.‎

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा‎ ज्योतिराव फुले यांनी तत्कालीन‎ समाजाला सामाजिक क्रांतीची नवी‎ दृष्टी दिली. त्यांनी पुरोगामी महाराष्ट्राची‎ मुहूर्तमेढ रोवली. त्यांच्या‎ जयंतीनिमित्ताने क्रांतीची ज्योत मातृतीर्थ‎ सिंदखेडराजा येथून देऊळगावराजा‎ मार्गे जालना, औरंगाबाद अहमदनगर,‎ पुणे नायगाव येथे जन्मगावी समारोप‎ केला जातो.‎ यावेळी रमेश कायंदे, माजी नगराध्यक्ष‎ कवीश जिंतूरकर, माजी जि .प सदस्य‎ मनोज कायंदे, संघर्ष समिती‎ जिल्हाध्यक्ष डॉ. सुनील कायंदे, माजी‎ नगरसेवक प्रदीप वाघ, गंगाधर‎ जाधव,,राजेंद्र डोईफोडे, हनीफ शहा,‎ इस्माईल बागवान, सुनील शेजुळकर,‎ बबलू जायभाये, सुरेश तिडके, अनिल‎ वाघ, ज्ञानेश्वर तिडके, विजय‎ खांडेभराड, बंडू झोरे, मनोज‎ खांडेभराड, जितेंद्र खंडारे, रमेश‎ जावळे, राजेश तायडे, शाम‎ खांडेभराड, संदीप झोरे, लक्ष्मण‎ खांडेभराड, प्रदीप शिंगणे, एकनाथ‎ सोनवणे, विठ्ठल माने, प्रकाश‎ खांडेभराड, दशरथ राठोड, अरविंद‎ खांडेभराड, मंगेश तिडके यांच्यासह‎ माळी समाज बांधव मोठ्या संख्येने‎ उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...