आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हितगूज:शाळांमध्ये शारीरिक शिक्षण, खेळ प्रभावीपणे राबवावे ; मेजर ध्यानचंद यांची जयंती साजरी

दुसरबीडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

लहान मुलांनी दररोज किमान अर्धा एक तास शारीरिक हालचाल केली पाहिजे. जेव्हा शारीरिक क्षमतेचा विकास होईल तेव्हा मुलांच्या बौद्धिकतेतही वाढ होईल. यासाठी पालकांचेही सहकार्य खूप महत्वाचे आहे. बऱ्याच शाळांमध्ये शारीरिक शिक्षण आणि खेळ प्रभावीपणे राबवले जात आहे. फक्त पालकांच्या सकारात्मक प्रतिसादाची गरज आहे, असे आवाहन भगवानबाबा शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव शिवराज कायंदे यांनी केले.

येथील नारायणराव नागरे महाविद्यालयात संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना विभाग चालवण्यात येतो. या विभागाच्या माध्यमातून हॉकी खेळाचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीचे औचित्य साधून महाविद्यालयात कार्यक्रमाचे आयोजन प्राचार्य तथा राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. विजय नागरे व शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख सर्जेराव वाघ यांनी केले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून हॉकीत राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवलेले प्रशांत उगलमुगले उपस्थित होते. या वेळी भगवानबाबा शिक्षण मंडळाचे सचिव शिवराज कायंदे, दिलीप नाईकवाड यांची प्रमुख उपस्थित होती.

मुलांच्या जडणघडणीत खेळाला अनन्यसाधारण महत्व आहे. खेळणे-बागडणे हे मुलांच्या आवडीचे क्षेत्र आहे. आज देशाला आत्मनिर्भर आणि सक्षम नागरिक हवा असेल, तर त्यांना लहानपणापासूनच शारीरिक सुदृढतेचे धडे देणे गरजेचे आहे. यातच योग्य मार्गदर्शन मिळाले, तर चांगले करिअर देखील घडू शकते, असे प्रतिपादन प्रशांत उगलमुगले यांनी व्यक्त केले. तर प्राचार्य डॉ. विजय नागरे यांनी झपाट्याने शहरीकरण होणाऱ्या नगरांमध्ये मुलांना खेळण्यासाठी खूप कमी मैदाने उपलब्ध असताना आपल्याला आढळून येतात. त्यातच पालकांची रोजची दैनंदिन कामासाठी चाललेली धावपळ यासारख्या कारणांमुळे बऱ्याचदा मुलांकडे दुर्लक्षही होत असल्याचे सांगून मुलांचा सर्वांगीण विकास हवा असेल, तर त्यासाठी मुलांची दैनंदिन जीवनात शारीरिक सक्रियता असणे खूप महत्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शारीरिक शिक्षण संचालक सर्जेराव वाघ यांनी केले. कार्यक्रमासाठी प्रा. धनश्री कायंदे, प्रा. मिलिंद गवई, प्रा. डॉ. देशमाने, प्रा. डॉ. गणेश घुगे, प्रा. महेश कायंदे, प्रा. नयना गवारे, प्रा. युनूस शेख, प्रा. तमन्ना शेख, प्रा. एकनाथ हरकळ, प्रा. गजानन राठोड यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन सौरभ बनसोड या विद्यार्थ्याने केले, तर आभार पूजा दराडेने मानले.

बातम्या आणखी आहेत...