आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

पोलिसांना कोरोना:पोलिस कर्मचारी पॉझिटीव्ह निघाल्याने पिंपळगाव राजा पोलिस स्टेशन बंद

खामगाव3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पिंपळगाव राजा पोलिस ठाण्याचा कार्यभार शिवाजी नगरकडे

पोलिस प्रशासनाच्या नकाशात सदैव झळकणारे खामगाव तालुक्यातील पोलिस ठाणे म्हणून ओळख असलेल्या पिंपळगाव राजा पोलिस ठाणे आज कोरोना या संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर येणाऱ्या काही दिवसंकरिता कंटेन्मेंट झोन म्हणून बंद करण्यात आले आहे.

या पोलिस ठाण्याचा पुढील कार्यभार हा खामगाव येथील शिवाजी नगर पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे. जिल्हा प्रशासनाकडून जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील भुजबळ यांनी याबाबत कळविल्याची माहिती पिंपळगाव राजा पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक योगेश धोत्रे यांनी बोलतांना दिली.

पिंपळगाव राजा येथे गत आठवड्यात सहाय्यक पोलिस निरीक्षक,दोन पोलिस कर्मचारी,एक होमगार्ड व इतर दोन जण असे एकूण ६ जण कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने गावात एकच खळबळ उडाली होती. त्या पॉझिटिव्ह नागरिकांच्या संपर्कात येणाऱ्या एकूण २६ जणांना स्थानिक आरोग्य विभागाने कोरोनटाइन करून त्यांच्या स्वॅबचे रिपोर्ट वैद्यकीय तपासणी करीता पाठविण्यात आले होते. त्यातील ४ नागरिक आज पुन्हा पॉझिटिव्ह आल्याने पोलिस प्रशासन व जिल्हा प्रशासन खळबडून जागी झाले व पिंपळगाव राजा पोलिस ठाणे सील करण्यात आले. त्यामुळे एकंदरीतच पिंपळगाव राजा व जिल्ह्याच्या पोलिस प्रशासनाच्या नकाशात प्रथमच हे पोलिस ठाणे पुढील काही दिवस बंद करण्यात आले असून या पोलीस ठाण्याचा कार्यभार शिवाजी नगर खामगाव पोलिस स्टेशनकडे सोपविण्यात आला आहे.

त्याचबरोबर आज पॉझिटिव्ह आलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाच्या संपर्कातील ६ जणांना व इतर ७ जणांना वैद्यकीय विभागाने खामगाव येथील सामान्य रुग्णालयात होम कोरोनटाईन करिता पाठवले असून त्यांची सुद्धा कोरोना चाचणी करण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. अरुण पानझाडे यांनी बोलतांना दिली. त्यामुळे गावात एकच खळबळ उडाली असून नागरिक भयभीत झाले आहेत,मात्र काही मोकाट टवाळके हे रस्त्याने जातांना मास्क न बांधता आपला मुक्तसंचार सुरुच ठेवत आहेत,तसेच गावातील काही दुकानदार हे दुकानदारी करतांना नियमांचा भंग करीत असून दुकानांवर मोठमोठे घोळके जमा होत आहेत. पोलिस प्रशासनाने त्यांच्यावर कडक कारवाई करणे गरजेचे झाले आहे, अन्यथा या घोळक्यानमधून कोरोनाचा उद्रेक व्हायला उशीर लागणार नाही एवढे मात्र खरे..!!

पुढील कामे शिवाजी नगर पोस्टे मधुन

वरिष्ठांच्या आदेशानुसार या पोलिस ठाण्याचा कार्यभार खामगाव येथील शिवाजी नगर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला असून पोलीस स्टेशन संबंधित कामे शिवाजी नगर पोलीस ठाण्यातुन होणार आहेत.- योगेश धोत्रे, पोलीस उपनिरीक्षक, पिंपळगाव राजा पोलिस ठाणे