आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यात यंदाच्या खरीप हंगाम सन २०२१-२२ साठी येथील कृषी विभागाने वहिती खालील ८३ हजार ९९३ हेक्टर जमिनीपैकी विविध खरीप पिकांचे नियोजन केले आहे. तर गतवर्षीच्या २०२०-२१ खरीप हंगामात ७९ हजार ७२० हेक्टर जमिनीवर नियोजन केले होते. मागील वर्षीच्या व यंदाच्या नियोजनाची आकडेवारी पाहता यंदा १ हजार ३५ हेक्टर जमिनीवर अधिक नियोजन करण्यात आले आहे. यंदाच्या नियोजनात गतवर्षीच्या तुलनेत यावेळी सोयाबीनचे नियोजन अधिक तर कापसाचे नियोजन कमी करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांचे उत्पन्नाचे मुख्य स्त्रोत हे खरीप हंगामातील पिकांपासून मिळणारे उत्पन्न आहे. मिळणाऱ्या या उत्पन्नातून शेतकरी आपल्या परिवाराचे वर्षभराचे रहाट गाडगे चालवतो. त्यामुळे खरीप हंगामात अधिकाधिक उत्पन्न मिळविण्यासाठी राबराबतो. परंतु गत २-३ वर्षापासून निसर्गाची अवकृपा झाल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला पिकांचा घास निसर्ग हिरावून नेत आहे.
यंदा चांगला पाऊस बरसणार असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवला जात आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी पेरणीपूर्व मशागतीच्या कामाला लागलेला दिसून येत आहे. मृग नक्षत्र लागायला १ महिन्यांचा कालावधी शिल्लक उरला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर बियाणे व खतांचे वाढलेल्या किंमती बरोबरच पैशांची जुळवाजुळव कशी करायची असे संकटे निर्माण झाली आहे.
तालुक्यातील बहुतांश कापूस उत्पादक शेतकरी गत ४-५ वर्षापासून सोयाबीन कडे वळला आहे. त्यामुळे सोयाबीनच्या पेऱ्यात वाढ होऊन कापसाच्या पेऱ्यात घट होत आहे. कापसाच्या पेऱ्यात घट होण्यात अनेक कारणे आहेत. त्यात प्रामुख्याने या पिकावर येणारी बोंडअळी व लाल्या ही प्रमुख कारणे आहे. यंदाच्या हंगामात सोयाबीनचे ३६ हजार हेक्टर जमिनीवर नियोजन करण्यात आले आहे. तर गत वर्षी ३४ हजार ५३२ हेक्टरवर नियोजन करण्यात आले होते. गतवर्षीची व यंदाची आकडेवारी पाहता यंदा १ हजार ४६८ हेक्टर जमिनीवर अधिक नियोजन आहे. गतवर्षी जिरायती व बागायती कापूस मिळून ३० हजार ६०० हेक्टरवर नियोजन आहे.
मात्र यंदा २६ हजार ३२८ हेक्टरवर नियोजन करण्यात आले आहे. गतवर्षी सूर्यफुलाचे ८० हजार हेक्टर जमिनीवर नियोजन करण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात १ हेक्टरवर प्रत्यक्ष पेरणी झाली होती. तर यंदा सूर्यफुलाचे नियोजन करण्यात आले नाही. सोयाबीन, कापसाप्रमाणेच अन्य खरीप पिकांचे यंदा काहीच कमी तर काहींचे जास्त नियोजन करण्यात आले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.