आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वृक्षारोपण:भारतीय मजदूर संघाच्या वतीने वृक्षारोपण

बुलडाणा3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राजस्थान मधील अमृता देवी यांच्यासह ३६३ व्यक्तींनी वृक्ष रक्षणाच्या दृष्टीने केलेल्या बलिदान दिनी भारतीय मजदूर संघाच्या वतीने चैतन्यवाडी समर्थ रामदास मंदिर परिसरात २८ ऑगस्ट रोजी वृक्षारोपण करण्यात आले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बुलडाणा विभाग संघचालक चित्तरंजन राठी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. संस्कृत भारतीचे जिल्हा संयोजक प्रा.विजय जोशी यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी भारतीय मजदूर संघाचे प्रदेश मंत्री रवींद्र गणेशे, जिल्हाध्यक्ष चंद्रकांत जोशी, प्रवीण महाजन, प्रशांत देशपांडे, भाजपा कामगार आघाडीचे विश्राम पवार, वैभव वाघमारे, राजेंद्र कमाने, रामभाऊ शिंदे, अनंत उबाळे, रवींद्र जाधव, रामदास बीडकर, रूपेश सोनटक्के, गोविंद सराफ, कैलास राऊत, महेश पेंडके, राजू पाथरकर, पेठे यांची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...