आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लागवड:दुसरबीड येथे गणेशोत्सवानिमित्त वृक्षारोपण ; शिक्षक व विद्यार्थी उपस्थित

दुसरबीड25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गणेशोत्सवाच्या निमित्ताने स्थानिक जीवन विकास महाविद्यालयात नुकतेच वृक्षारोपण करण्यात आले. दरम्यान लागवड केलेल्या रोपट्यांचे संवर्धन करण्याची शपथ यावेळी उपस्थित मान्यवरांनी घेतली.या वेळी प्राचार्य गणेश भांगे, पर्यवेक्षक जी. बी. देशमुख, गजानन देशमुख, ए. एस. तरवडे, राहुल राजेशिर्के, विनोद झाटे, दामोदर वायाळ, दिनकर वाघमारे, ज्ञानेश राजेजाधव, रवींद्र धन्नावत, नरेंद्र पोटोडे, नारायण महाडिक, कृष्णा देशमुख, अशोक शेवलकर उपस्थित होते. जीवन विकास महाविद्यालयाच्या परिसरात प्राचार्य भांगे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. गणेशोत्सव साजरा करण्यात सर्वांनाच आनंद मिळतो, परंतु उत्सव साजरा करताना, पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही, याची काळजी घ्यावी. प्रत्येकाने पर्यावरणपूरक उत्सव साजरा करावा, असे आवाहन भांगे यांनी केले. यावेळी महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...