आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नियमांची ऐसीतैसी:प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी होईना, कारवाईची मागणी‎; हॉटेल, कापड, किराणा‎ दुकानांमध्ये प्लास्टिक पिशव्यांचा सर्रास वापर‎

बुलडाणाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हाभरात प्लास्टिक‎ बंदीचा बोजवारा उडाला असून‎ हॉटेल, कापड व किराणा दुकानात‎ प्लास्टिक पिशव्यांचा सर्रास वापर‎ होत आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळ व‎ पर्यावरण विभागाने दोषींवर कारवाई‎ करण्याची मागणी होत आहे.‎ राज्य सरकारने सिंगल युज‎ प्लास्टिकवर बंदी घातली असून‎ प्लास्टिक बंदीची कडक‎ अंमलबजावणी करण्याचे ठरवले‎ असतानाही जिल्हाभरातील आठवडी बाजार व शहरातील दुकानांमध्ये पिशव्यांचा सर्रास वापर करण्यात येत आहे.

जिल्ह्यातील बाजारपेठेच्या मोठ्या गावांसह इतर‎ सर्वच गावांत हॉटेल, कापड, किराणा‎ व इतर दुकानांमध्ये व्यापारी सिंगल‎ युज प्लास्टिक पिशव्यांचा सर्रासपणे‎ वापर करताना दिसून येत आहेत.‎ मोठ्या शहरांमध्ये नगरपालिकेच्या‎ वतीने अधूनमधून कारवाई करण्यात येते. असे असले तरी त्या कारवाईमध्ये सातत्य नसल्याने पुन्हा परिस्थिती जैसे थेच होऊन जाते. यासह नगरपंचायत व‎ ग्रामपंचायत पातळीवर अद्याप पर्यंत तरी कुठलीच मोहीम‎‎ राबवण्यात आली नसल्याचे कळते.‎

प्लास्टिक चोरीच्या मार्गाने उपलब्ध‎ होत असल्याने आणि प्रशासनदेखील‎ काहीच कारवाई करत नसल्याने‎ सिंगल युज प्लास्टिक पिशव्यांचा‎ वापर वाढला आहे. सध्या‎ लग्नसराईचा हंगाम जोरात सुरू‎ असून जेवणासाठी प्लास्टिकची ताटे,‎ ग्लास, द्रोण आदींचा सर्रास वापर‎ होत असून निकामी झालेल्या ‎प्लास्टिकच्या या वस्तूंची योग्य‎ विल्हेवाट न लावता रस्त्यावर टाकून देतात. रस्त्यावर पडलेल्या अन्न‎ चिकटलेल्या उष्ट्या पत्रावळ्या‎ जनावरे खात असल्याने प्लास्टिक‎ पोटात गेल्याने काही जनावरे‎ मृत्युमुखी पडल्याच्या घटना घडल्या ‎आहेत. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण‎ मंडळ व पर्यावरण विभागाने २६‎ जानेवारी २०२० प्रजासत्ताक‎ दिनापासून प्लास्टिक पिशवी मुक्त महाराष्ट्र संकल्प अभियान प्रभावीपणे‎ राबवण्याचे ठरवले असून त्यासाठी‎ डेडलाइन देण्यात आली होती. शासनाने डेडलाइन देऊनही त्याकडे‎ फारसे लक्ष न देता ग्रामीण भागातील‎ प्रशासनाने अद्याप काहीच हालचाली‎ केल्या नसल्याचे दिसून येत आहे.‎ प्रदूषण नियंत्रण मंडळ व पर्यावरण‎ विभागाने याची दखल घेऊन सिंगल‎ युज प्लास्टिकच्या पिशव्या वापरणारे‎ व विक्री करणाऱ्यांवर कारवाईची‎ मागणी होत आहे.

असा आहे दंडाचा प्रकार
सर्वत्र सिंगल युज प्लास्टिक वापरण्यात येत असून त्यावर कारवाई होताना दिसत नाही. दरम्यान, जिल्ह्यामधील जे व्यावसायिक याचा वापर करताना त्यांच्यावर प्रशासनाच्यावतीने दंडात्मक कारवाईची देखील तरतूद आहे. त्यामध्ये पहिला गुन्हा केल्यास ५००० रुपये दंड, दुसरा‎ गुन्हा १०००० रुपये दंड, तिसरा गुन्हा‎ २५००० रुपये दंड, ३ महिने कारावास‎ अशी शिक्षा आहे. मात्र अनेकवेळा हितसंबंध आड येत असल्याने कारवाई होत नसल्याचे वास्तव चित्र आहे.‎

बंदी असलेले प्लास्टिकचे सर्व घटक असे : सर्व प्रकारच्या प्लास्टिक पिशव्या, नॉन ओव्हन बॅग्ज यासह थर्माकोल‎ (पॉलिस्टायलिन) व प्लास्टिकपासून बनवण्यात येणाऱ्या तसेच एकदाच‎ वापरल्या जाणाऱ्या डिस्पोजेबल वस्तू त्यामध्ये ताट, कप, प्लेट्स, ग्लास, काटे,‎ वाटी, चमचे आदी वस्तूंचा समावेश होतो.

लवकरच जनजागृती‎ मोहीम राबवणार
सिंगल युज प्लास्टिक बंदीबाबत‎ लवकरच मोताळा तालुक्यात जनजागृती‎ मोहीम राबवण्यात येणार असून‎ नागरिकांनी कापडी पिशव्या,‎ कंपोस्टेबल प्लास्टिक इत्यादींचा‎ वापर करावा. प्लास्टिकमुळे पर्यावरणाची हानी होते. याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करूनही‎ वापर न थांबल्यास दंडात्मक‎ कारवाई करण्याच्या सूचना संबंधितास देण्यात येणार आहे.
डॉ. सारिका भगत, तहसीलदार, मोताळा

बातम्या आणखी आहेत...