आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्पर्धांचे आयोजन:कोल्हापूरच्या स्पर्धेत बुलडाण्यातील खेळाडूंची बाजी‎

बुलडाणा‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मॅराथॉन हाफ आयर्न मॅन अशा विविध‎ स्पर्धांचे आयोजन जगभरात केले जाते,‎ काही काळाआधी सदर स्पर्धा या‎ पाश्चिमात्य देशामध्ये आयोजित केल्या‎ जात होत्या. आता या स्पर्धांचे आयोजन‎ भारतातही होऊ लागले आहे. अशा स्पर्धेत‎ स्पर्धक भाग घेवून स्वतःच्या शरीराचा‎ फिटनेस त्याचप्रमाणे छंदही जोपासतात.‎ लहान-लहान शहरातून सुध्दा आता अशा‎ स्पर्धांमध्ये भाग घेण्याकरिता स्पर्धक तयार‎ व्हायला लागले आहेत, अशा स्पर्धांमध्ये‎ भाग घेणे खर्चीक असले तरी अनेक हौशी‎ स्पर्धक छंद, साहस व फिटनेस‎ जपण्यासाठी भाग घेतात.

यामध्ये‎ बुलडाण्याच्या खेळाडूंनी चमकदार‎ कामगिरी केली आहे.‎ बुलडाणा येथील ज्ञानगंगा फॉरेस्ट रनर्स‎ ग्रुपच्या माध्यमातून या स्पर्धेत जाण्याची‎ तयारी गेल्या चार वर्षांपासून सुरु झाली.‎ नुकतीच भारतातील प्रतिष्ठेची मानली‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ जाणारी टाटा मुंबई आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन १५‎ जानेवारी रोजी मुंबईला पार पडली.‎ त्यामध्ये बुलडाणा जिल्ह्यातील जवळपास‎ २५ ते ३० स्पर्धकांनी भाग घेतला. त्यापैकी‎ बुलडाणा शहरातील १५ खेळाडूंनी फुल‎ मॅरेथॉन ४२ कि.मी. वेळेच्या आत‎ यशस्वीरित्या पूर्ण केली. त्याचप्रमाणे‎ अतिशय कठीण व साहसी बर्ग मॅन (हाफ‎ आर्यमॅन) स्पर्धा की ज्यामध्ये १.९ कि.मी.‎ पोहणे, ९० कि.मी.-सायकलींग, २१.१‎ कि.मी. धावणे ८ तास ३० मि. मध्ये पूर्ण‎ करायचे असते.

सदर स्वरुपाची स्पर्धा ही‎ २९. जानेवारी .२०२३ रोजी कोल्हापूर येथे‎ आयोजित केली होती. सदर स्पर्धेमध्ये‎ देश-विदेशातील जवळपास महिला व पुरुष‎ मिळून तीनशे स्पर्धकांनी सहभाग नोंदवला.‎ सदर स्पर्धेमध्ये बुलडाणा शहरातील‎ चांडक ले आऊट येथील संदीप शालिग्राम‎ शेळके व आरास ले आऊट मधील किरण‎ दिगंबर तायडे यांनी सहभाग घेतला होता.‎ सदर स्पर्धा संदीप शेळके यांनी ६ तास ४०‎ मिनीटामध्ये पूर्ण केली तर किरण तायडे‎ यांनी ७ तास १९ मिनीटामध्ये पूर्ण केली.‎ सदर स्पर्धा पूर्ण करणारे हे बुलडाणा‎ शहरातील पहिलेच स्पर्धक ठरले आहेत.‎ त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.‎ ज्ञानगंगा फॉरेस्ट रनर्स ग्रुपच्या माध्यमातून‎ अशा विविध स्पर्धेत भाग घेण्याची‎ चळवळ सुरु झाली आहे, या यशाचे श्रेय ते‎ ज्ञानगंगा फॉरेस्ट रनर्स ग्रुपचे सर्व सदस्य‎ तसेच मार्गदर्शक म्हणून लाभलेले नितीन‎ चौधरी व अ‍ॅड. शरद राखोंडे यांना देत‎ आहे.‎

बातम्या आणखी आहेत...