आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अत्याचार:महिला पोलिसावर पोलिसाचा अत्याचार; शेगाव शहर पोलिसांत गुन्हा दाखल

शेगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला पोलिस दलात कार्यरत असलेल्या एका महिला पोलिस कर्मचाऱ्यावर शेगाव शहरातील रहिवासी असलेल्या व अकोला पोलिस दलात कार्यरत असलेल्या एका पोलिस कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केला आहे. ही घटना आज २ जून रोजी उघडकीस आली आहे.

अकोला जिल्हा पोलिस दलात कार्यरत असलेली बत्तीस वर्षीय पीडित महिला व आरोपी पोलिस कर्मचारी आकाश सुरेश वाघमारे वय ३२ या दोघांची ओळख झाली. मोबाइलवर दोघांचे बोलणे सुद्धा होत होते. डिसेंबर २०२१ मध्ये आरोपीने एका प्रकरणात बोलायचे आहे, तू शेगावला ये, असे खोटे बोलून तिला शेगावला बोलावून घेतले. त्यानंतर त्याने तिला शहरातील एका लॉजवर नेऊन जबरदस्तीने तिच्यावर अत्याचार केला. हा विषय तुझ्या नवऱ्यास सांगितल्यास तुला व तुझ्या नवऱ्यास जिवाने मारण्याची धमकी दिली. त्यामुळे पीडित महिलेने भीतीपोटी तक्रार दिली नाही. मात्र ३० मे रोजी आरोपीने पीडित महिलेस पुन्हा कॉल करून शरीर सुखाची मागणी केली. त्यामुळे पीडित महिलेने सरळ शहर पोलिस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून शहर पोलिसांनी आरोपी पोलिस कर्मचारी आकाश सुरेश वाघमारे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक गौतम इंगळे हे करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...