आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस कारवाई:दाल फैल भागात जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड; 13 हजार 460 रुपये रक्कम हस्तगत

खामगावएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील दाल फैल भागात सुरू असलेल्या जुगार अड्यावर पोलिसांची धाड टाकून आठ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यावेळी घटनास्थळावरून पोलिसांनी २४ हजार रुपयांचा माल जप्त केला आहे. ही कारवाई आज २१ जून रोजी केली. या प्रकरणातील काही आरोपी फरार झाले असून पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत. दाल फैल भागात वरली मटक्याचा जुगार सुरू असल्याच्या माहितीवरून पोलिसांनी छापा टाकून आठ आरोपींविरुद्ध कारवाई केली आहे. पोहेकॉ नीलसिंग मोहनसिंग चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी सागर नंदकिशोर सीतापुरे ऊर्फ सागर राणा वय २६ वर्षे रा. दालफैल, योगेश संभाजी डुबल वय ४२ वर्षे रा. रावण टेकडी, योगेश पुंजाजी कळमकार वय ३६ वर्षे रा. दालफैल, सागर राजू उमाळे वय २५ वर्ष रा.दालफैल, पंकज राठोड ऊर्फ पंकज राणा रा. दालफैल, मयूर नारायण कोशीसा रा. खामगाव, रवि ठोसर, राहुल कळमकार रा.खामगाव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. यावेळी पोलिसांनी घटनास्थळावरून रोख १३ हजार ४६० रुपये, ११ हजार रुपये किंमतीचे दोन मोबाइल, मटक्याचे साहित्य २४ हजार ४७० रुपयांचा माल जप्त केला आहे. ही कारवाई पोहेकॉ निलसिंग चव्हाण, पोना रामेश्वर फासे, अफसर तडवी, पोकॉ गुरुदेव यांनी केली आहे.