आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विसर्जन मिरवणुक:मिरवणुकी दरम्यान पोलिस; महसूल अधिकाऱ्यांचा सत्कार

खामगाव23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

यंदा कोरोना निर्बंध हटवण्यात आल्यामुळे गणेश मंडळे व भाविकांमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीत मोठ्या प्रमाणात उत्साह दिसून आला. यावेळी माजी आ.दिलीप सानंदा यांनी शहरातील विविध मंडळांना भेटी देऊन गणेश मंडळाचे अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला. मिरवणुकी दरम्यान अनुचित प्रकार घडू नये या अनुषंगाने शहरामध्ये तगडा पोलिस बंदोबस्त लावून विविध व्यवस्थेची प्रशासकीय यंत्रणेकडून पूर्तता केली होती.

अमरावती विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक चंद्रकिशोर मीना हे देखील विसर्जनाच्या दिवशी शहरामध्ये दाखल झाले होते. पोलिस प्रशासन, महसूल प्रशासन, गणेश मंडळे, नागरिकांच्या सहकार्याने गणेश विसर्जन मिरवणुक निर्विघ्नपणे व शांततेत पार पडली.

यावेळी गणेश विसर्जन मिरवणुक उत्साहपूर्ण वातावरणात शांततेत पार पाडल्याबद्दल मस्तान चौक येथे जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद चावरिया, मुंबई पोलिस उपायुक्त तथा तत्कालीन अप्पर पोलिस अधीक्षक हेमराजसिंह राजपूत, उपविभागीय अधिकारी प्रदीप पाटील, पोलिस अधिकारी संदेश नाईक, उपविभागीय महसूल अधिकारी राजेंद्र जाधव, तहसीलदार अतुल पाटोळे यांचा माजी आ.दिलीप सानंदा यांनी सत्कार केला. यावेळी गणेश मंडळांचे अध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...