आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मतदान:रुईखेड मायंबा येथे मतदान शांततेत, 80 टक्के मतदान

बुलडाणा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील रुईखेड मायंबा येथे आज १८ डिसेंबर रोजी ग्रामपंचायत निवडणूकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली चार वॉर्डासाठी चार बूथ ठेवण्यात आले होते. गावात २७३६ मतदारांची संख्या आहे. त्यापैकी २१९२ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. त्यामध्ये ११६६ पुरुष व १०२६ महिलांचासमावेश आहे.

मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी डी. यू. पवार, एस. एस. भारसाकळे, आर. वाय. खान, एस. डी. कोलते यांची उपस्थिती होती. मतदान प्रक्रिये दरम्यान कुठलीही अनुचित घटना होवू नये, यासाठी धाडचे ठाणेदार अनिल पाटील व इतर पोलिस कर्मचारी लक्ष ठेवून होते. या निवडणुकीत शंभर ते सव्वाशे मतदाराचे यादीत नाव नसल्यामुळे त्यांना मतदानाचा हक्क बजावता आला नाही.

बातम्या आणखी आहेत...