आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शांता:लोणार तालुक्यात मतदान शांततेत

लोणार2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील ३६ ग्रामपंचायतींसाठी आज, दि. १८ मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. तालुक्यातील मतदारांमध्ये विशेषत: वयोवृद्ध व युवकांमध्ये मोठा उत्साह दिसून आला.

तालुक्यातील १२१ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडली. सायंकाळी ५ वाजेपर्यंत ७५ टक्के मतदान झाले. तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी सैफन नदाफ यांच्या मार्गदर्शनात मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी ठाणेदार ठाकूर यांच्या मार्गदर्शनात तालुक्यातील सर्व मतदान केंद्रांवर चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

दिग्गजांकडून मतदारांची मनधरणी
लोणार तालुक्यातील सुलतानपूर, सरस्वती, गायखेड ,शारा, अजसपूर, खुरामपूर, चिंचोली, सांगळे तांबोळा, भुमराळा, सावरगाव तेली, दाभा, टिटवी या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळे मते मिळवण्यासाठी अनेक दिवस दिग्गजांकडून मतदारांची सर्वप्रकारी मनधरणी सुरू होती.

बातम्या आणखी आहेत...