आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मतदान:चिखलीत 23 ग्रामपंचायतींच्या 72 केंद्रांवर होणार मतदान

चिखली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील २३ ग्रामपंचायतींमध्ये दि. १८ डिसेंबर रोजी निवडणूक होणार आहे. त्यासाठी निवडणूक विभागाने तयारी पूर्ण केली अाहे. या २३ ग्रामपंचायतींसाठी ७२ केंद्रांवर २८८ निवडणूक कर्मचारी, तर बंदोबस्तासाठी ७२ पोलिस अशा एकूण ३६० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दि. १७ डिसेंबर रोजी दुपारी सर्व कर्मचारी साहित्यासह निवडणूक केंद्रांवर पोहोचणार आहेत.

निवडणूक आयोगाद्वारे तालुक्यातील कार्यकाळ संपलेल्या २८ ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर झाली होती. त्यापैकी पाच ग्रामपंचायतींमध्ये बिनविरोध निवडणूक झाली. या पाच गावांतील पाच सरपंच आणि बिनविरोध झालेल्या गावांसहित अन्य ठिकाणचे असे १५ वाॅर्ड बिनविरोध निवडले गेले असून, यामधील एकूण ९६ सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत.

तालुक्यातील उर्वरित २३ गावांमधील सरपंचांच्या २३ जागांसाठी ७९ जण निवडणूक रिंगणात आहेत, तर ७२ प्रभागांमधून १२४ सदस्य निवडून द्यायचे आहेत.

बातम्या आणखी आहेत...