आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रीय पोषण कार्यक्रम:मालेगाव येथे ‘पोषण महिना’ अभियानास प्रारंभ ; महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने उपक्रम

वाशीमएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रीय पोषण कार्यक्रमांतर्गत दरवर्षी महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने सप्टेंबर महिना हा ‘राष्ट्रीय पोषण महिना’ म्हणून साजरा केला जातो. महिला व बालकांचे आरोग्य, पोषण व शिक्षण, आदिवासी भागातील महिला व बालकांसाठी पारंपरिक खाद्यपदार्थ बनवणे, जलसंधारण व्यवस्थापन या चार प्रमुख संकल्पनांवर आधारित पोषण अभियान प्रभावीपणे राबवण्याच्या अनुषंगाने जि. प. च्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांच्या निर्देशानुसार व बालकल्याणचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय जोल्हे यांच्या मार्गदर्शनात १ सप्टेंबर रोजी मालेगाव प्रकल्पातून जिल्हास्तरीय पोषण महिना अभियानास प्रारंभ झाला.

यावेळी निती आयोगाचे विकासात्मक भागीदार ‘पिरामल फाउंडेशन’चे दिगंबर घोडके, जि. प. सदस्या कल्पना राऊत, पं.स.च्या उपसभापती श्रीमती घोडे, गटविकास अधिकारी किशोर काळपांडे, पं.स. सदस्य रवींद्र देशमुख, तालुका वैद्यकीय अधिकारी काळे व बालविकास प्रकल्प अधिकारी मदन नायक यांची प्रमुख उपस्थिती होती.

याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी पोषण महिन्यांतर्गत राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. या उपक्रमांचा लाभ प्रत्येक घटकांपर्यंत पोहोचवण्याचे काम अंगणवाडी सेविका, आशा व प्रत्येक विभागाने करावे, असे आवाहन बालकल्याणचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय जोल्हे यांनी केले. तर निती आयोगाचे जिल्हा समन्वयक दिगंबर घोडके यांनी पोषण अभियानाला जनआंदोलनाचे स्वरूप द्यावे व पोषणाचे महत्त्व प्रत्येक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन केले. त्यानंतर उपस्थित जि.प. सदस्य कल्पना राऊत, रवींद्र देशमुख यांनीसुद्धा उपस्थितांना मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटविकास अधिकारी किशोर काळपांडे यांनी, तर आभार बाल विकास प्रकल्प अधिकारी मदन नायक यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी पर्यवेक्षिका साधना इथापे, नंदा झळके, मीनाक्षी सुळे, दिलीप घुगे व रमेश कांबळे यांनी परिश्रम घेतले.

बातम्या आणखी आहेत...