आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रा.पं. सदस्यांचा आरोप:डोंगरखंडाळा सरपंचाने खोट्या जातप्रमाणपत्राद्वारे बळकावले पद; पडताळणीच्या कारभाराबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

बुलडाणा3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

चिखली तालुक्यातील डोंगरखंडाळा येथील सरपंचाने खोट्या जात प्रमाणपत्राच्या आधारे सरपंच पद बळकावले आहे, असा आरोप ग्रामपंचायत सदस्यांनी केला आहे. याबाबत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे तक्रार दाखल केली आहे. मात्र समितीकडून निकाल जाहीर करण्यास जाणीवपूर्वक विलंब केला जात असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. या बाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे रितसर तक्रार दाखल करण्यात आली आहे.

सार्वत्रिक निवडणूक २०२०-२१ साठी डोंगरखंडाळा ग्रामपंचायतीचे सरपंच पद अनुसूचित जाती सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आले होते. परंतु बबन तुलाराम गाडगे यांनी बनावट जात प्रमाणपत्र सादर करुन सरपंच पद बळकावले, असा आरोप ग्रामपंचायत सदस्या प्रज्ञा गुलाबराव कांबळे यांनी केला आहे. याबाबत त्यांनी ८ जुलै २०२१ रोजी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे तक्रार दाखल केली होती. यावर तीन सदस्यीय समितीने सविस्तर चर्चा केली. मात्र ऐनवेळी समितीने जाणीवपूर्वक निर्णय जाहीर केला नाही.

यामध्ये काहीतरी गौडबंगाल असल्याचा आरोप सदस्या प्रज्ञा कांबळे यांनी केला आहे. शासनाने ठरवून दिलेला कालावधी संपला तरी समितीने आपला निर्णय दिला नाही. सरपंच बबन तुकाराम गाडगे हे १५ महिन्यांपासून बनावट जातप्रमापत्राच्या आधारे सत्ता भोगत आहेत. परिणामी अनुसूचित जातीच्या खऱ्या लाभार्थ्यावर अन्याय होत आहे.

त्यामुळे बबन तुकाराम गाडगे यांच्यावर ॲट्रासिटी ॲक्टनुसार गुन्हे दाखल करुन त्यांचे सरपंचपद, ग्रामपंचायत सदस्यत्व रद्द करावे, अशी मागणी प्रज्ञा कांबळे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे २५ मार्च रोजी केली आहे. यावेळी उपसरपंच श्याम सावळे, सदस्य दिलीप काकडे, मीना सावळे, महेश सावळे, अमोल भंडारे, तुळशीराम डोंगरे, राऊ पवार, विजय वानखेडे, शरद मिसाळ, बाबुराव पवार, वसंतराव इंगळे, निंबाजी भोंडे, प्रकाश काकडे, भाऊराव शिनगारे, संजय काकडे, सुरेश मिसाळ, भारत सपकाळ, प्रमोद खरात यांची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...