आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेथील पत्रकार राजेश पंडित यांचे वडील रामदास पंडित यांचे ३ जानेवारी रोजी पहाटे तीन वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यू पश्चात त्यांचे मरणोत्तर नेत्रदान करण्याचा निर्णय त्यांचा मुलगा राजेश पंडित व त्यांचे नातेवाईक नाभिक समाजाचे तालुका अध्यक्ष सुनील शेजुळकर यांनी घेतला होता. जायंट्स ग्रुपचे माजी अध्यक्ष डॉ. अशोक काबरा व जायंट्स वेल्फेअर फाउंडेशनचे सन्मती जैन यांना माहिती देऊन नेत्रदान करून घेण्या बाबत कळविले.
त्यानुसार जालना येथील गणपती नेत्रालयाच्या डॉ. राधिका दरक व त्यांच्या चमूने येऊन नेत्रदान प्रक्रिया पार पाडली. यावेळी नाभिक समाजाच्या १०८ महिला व पुरुषांनी ११ ऑक्टोबर २०१६ रोजी सामूहिकरीत्या मरणोत्तर नेत्रदान करण्याचा संकल्प केला होता.
त्या दिवशी नाभिक समाजाचे ज्येष्ठ नागरिक म्हणून रामदास पंडित यांनी सर्वप्रथम मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प केला होता. त्याची आठवण म्हणून त्यांच्या परिवारातील सदस्यांनी वडिलांची अंतिम इच्छा पूर्ण केली आहे. त्यामुळे या परिवाराने समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे. रामदास पंडित यांचे पश्चात पत्नी, तीन मुले, सुना, नातवंड असा बराच मोठा आप्त परिवार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.