आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील धमाणे येथे पंतप्रधान आवास योजना राबवली जाते आहे. या योजनेची ड यादी दिशाभूल करणारी असून तिची चौकशी करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. याविषयी ग्रामस्थांनी गटविकास अधिकारी आर. डी. वाघ यांना निवेदन दिले.निवेदनात म्हटले आहे की, पंतप्रधान आवास घरकुल योजनेंतर्गत शासनाच्या परिपत्रकानुसार ऑटो जनरेटेड यादीतील पात्र लाभार्थींची निवड करण्यात आली आहे. बोगस ग्रामसभा झाल्याचे दाखवून लाभार्थी निवडण्यात आले आहे. कारण ऑटो जनरेटेड यादीत ९३९ लाभार्थी पात्र असून ही आकडेवारी शासनाची दिशाभूल करणारी आहे. धमाणे गाव धुळे शहरापासून १२ किमी अंतरावर आहे.
हे गाव सदन असून सद्य:स्थितीत धमाणे गावात ५०० कुटुंब असून त्यापैकी ९३९ कुटुंब घरकुलांसाठी पात्र कसे असू शकतात. तसेच पात्र यादीतील लाभार्थींची पक्की-दुमजली घरे आहे. ही यादी तयार करतांना पात्र लाभार्थ्यांना योजनेच्या लाभापासून वंचित ठेवण्यात आले आहे. ज्यांना घरकुल मंजूर झाले आहे ते योजनेसाठी खरोखर पात्र आहे का याची तपासणी करावी, बोगस लाभार्थ्यांचे नाव यादीतून वगळण्यात यावे, या प्रकरणी दोषींवर कारवाई करावी, दिव्यांगाना प्राधान्याने घरकुल योजनेचा लाभ घ्यावा, अन्यथा लाभार्थी व दिव्यांग प्रहार अपंग क्रांती संघटनेतर्फे उपोषण केले जाईल, असा इशारा धमाणे येथील प्रवीण वाघ, नरेंद्र बाविस्कर, महेश निकम, भूषण वंजारी, गोकुळ माळी, अमोल मोरे, विलास पाटील आदींनी दिला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.