आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आशिया चषक:प्रथमेश जवकार आशिया चषक स्पर्धेत चमकला

बुलडाणा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पिंपळगाव काळे येथील बापुमिया सिराजोद्दिन पटेल कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयाचा विद्यार्थी प्रथमेश समाधान जवकार याने १२ ते २० मार्च २०२२ या दरम्यान फुकेट थायलंड येथे झालेल्या तिरंदाजी आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघाला रजत पदक मिळवून दिले आहे. तिरंदाजी कंपाऊंड प्रकारात भारतीय संघाचा अंतिम सामना कझाकिस्तानसोबत झाला. त्यामध्ये भारतीय संघाचा एका गुणाने पराभव झाला. त्यामुळे संघाला रजत पदकावर समाधान मानावे लागले.

तिरंदाजीत चार खेळाडूच्या संघामध्ये प्रथमेश द्वितीय क्रमांकावर आहे. खेळाडूंचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ॲड.सलीम पटेल, संचालक प्रा.काय्युम पटेल, सहसचिव सिराजोद्दीनभाई पटेल, रब्बानी देशमुख, प्राचार्य डॉ.आई.ए.राजा, मार्गदर्शक चंद्रकांत इलग, शारीरिक शिक्षण संचालक प्रा.डॉ.बाबाराव सांगळे तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थ्यानी कौतुक केले.

बातम्या आणखी आहेत...