आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेपत्ता:बस प्रवासादरम्यान गर्भवती महिला बेपत्ता

देऊळगावराजा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बसने प्रवास करणारी गर्भवती महिला बेपत्ता झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली आहे. ही महिला देऊळगावमही ते देऊळगावराजा दरम्यान प्रवास करत होती.या प्रकरणी नितेश दामोदर गिरी यांनी पोलिसांत फिर्याद दिली. त्यांची पत्नी किरण गिरी (१९), रा. तुळजापूर, सध्या रा. देऊळगावमही हिने आपल्याला जालना येथे दवाखान्यात तपासणीसाठी जायचे असल्याचे सांिगतले. मात्र, पोटात दुखत असल्यामुळे मी दुचाकीवर येत नाही.

मला बसमध्ये बसून द्या असे तिने सांगितले. त्यानुसार देऊळगावमही येथून बसमध्ये बसवून देऊन नितेश आपल्या दुचाकीने देऊळगावराजा येथे पोहोचले. मात्र, बराच वेळ होऊनही किरण आली नाही. नितेश यांनी घरी तुळजापूर (ता. देऊळगावराजा) येथे वडिलांना काॅल करून विचारले. मात्र, किरण तुळजापूर येथे पोहोचली नव्हती. त्यानंतर नातेवाईकांकडे विचारणा केली. मात्र, किरणची माहिती मिळाली नाही. अखेर नितेश गिरी यांनी पोलिसांत फिर्याद नोंदविली. त्यावरून पोलिसांनी बेपत्ता असल्याची नोंद केली आहे.

बातम्या आणखी आहेत...