आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाहणी:सेवा हक्क आयुक्त येणार म्हणून सेवा फलके तयार ; आयुक्त डॉ. नारूकुल्ला रामबाबू यांनी केली पाहणी

बुलडाणाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राज्य सेवा हक्क आयुक्त येणार म्हणून सेवेची फलके स्थानिक स्वराज्य संस्थेत लावण्यात आली होती. विशेष म्हणजे नगर पालिकेत प्रथमच असे फलक उभे करण्यात आल्याने कोणाकडे कोणते काम आहे. याची माहिती लोकांना झाली. दरम्यान, नागरिकांना आवश्यक असलेल्या सेवा विहित मुदतीत मिळाव्यात. यासाठी लोकसेवा हक्क कायदा निर्माण करण्यात आला आहे. त्यामुळे शासकीय यंत्रणांची जबाबदारी वाढली आहे. कार्यालयाच्या अधिकाधिक सेवा आपले सरकार पोर्टलवर उपलब्ध करून नागरिकांना मुदतीत सेवा मिळाव्यात यासाठी विभाग प्रमुखांनी प्रयत्नशील रहावे, असे आवाहन अमरावती महसुली विभागाचे राज्य सेवा हक्क आयुक्त डॉ. नारूकुल्ला रामबाबू यांनी केले. येथील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आज राज्य सेवा हक्क कायद्यानुसार नागरिकांना देण्यात आलेल्या अधिकाराचे माहिती डॉ. रामबाबू यांनी दिली. यावेळी जिल्हाधिकारी एस. राममुर्ती, अतिरिक्त जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते आदी उपस्थित होते. डॉ. रामबाबू म्हणाले की, लोकसेवा हक्काच्या बाबतीत जिल्ह्याने चांगले कार्य केले आहे. दाखल झालेल्या प्रकरणांपैकी सुमारे ९८ टक्के प्रकरणे निकाली निघाली आहेत. संपूर्ण विभागातून दहा अपील दाखल झाले असून जिल्ह्यातून एकही तिसरे अपील दाखल झालेले नाही, ही प्रशंसनीय बाब आहे. आपल्या विभागाच्या अधिकाधिक सेवा, सुविधा राज्य लोकसेवा हक्काखाली आणून चांगली सेवा देण्यासाठी प्रत्येकाने मानसिकता करावी, असे आवाहन डॉ. रामबाबू यांनी केले. जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांनीही ऑनलाइन सेवांबद्दल आलेल्या अनुभवांची माहिती दिली.

जिल्हा परिषद, नगरपालिकेला भेटी डॉ. रामबाबू यांनी सेवा हक्क कायद्याच्या अंमलबजावणी संदर्भात जिल्हा परिषद आणि नगर पालिकेला भेट दिली. त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत राबवण्यात येत असलेल्या ऑनलाइन सेवा संदर्भात माहिती घेतली. प्रामुख्याने नगर पालिकेमध्ये जन्म-मृत्यूचे दाखले ऑनलाइन देण्यासंदर्भात त्यांनी सूचना केल्या. तसेच ऑफलाइन सेवा ऑनलाइन करण्यावर लक्ष केंद्रीत करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

बातम्या आणखी आहेत...