आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाल्याचे पाणी:साखरखेर्डा परिसरात पावसाची हजेरी ; जीव मुठीत धरून चालवावे लागते वाहन

साखरखेर्डा20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सावरखेर्डा परिसरात सतत दोन दिवसांपासून दमदार पाऊस होत आहे. यामुळे शेतकरी सुखावला असला आहे. परिसरात १० जूनच्या रात्री उशिरापर्यंत पावसाने दमदार हजेरी लावल्याने गावातील नाली खळाळून वाहिली. परंतु या नालीचे पाणी रस्त्यावर आल्याने वॉर्ड क्रमांक दोनमध्ये घाणीचे साम्राज्य पसरले आहे.

दरम्यान, १२ जून रोजी रात्री ११ वाजता साखरखेर्डा, शेंदुर्जन, मलकापूर पांग्रा, देऊळगाव कोळ, दुसरबीड परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाने दमदार हजेरी लावली. तब्बल दोन तास पाऊस बरसत राहिल्याने रस्त्यावरुन पाणी वाहात होते. साखरखेर्डा गावातील रोड लगत नाल्यांची साफसफाई न झाल्याने पावसाचे पाणी साखरखेर्डा ते लव्हाळा रोडवर आले. वॉर्ड क्रमांक एक मधील घनकचरा चक्क वॉर्ड क्रमांक दोन मधील देवीच्या मंदीर परिसरात साचलेला दिसून आला. महाराणा प्रताप नगरातील युवकांनी या बाबत ग्राम पंचायत मध्ये तक्रार दाखल केली. ग्राम पंचायत सदस्य उल्हास देशपांडे यांच्या घरासमोर पाण्याचा डबके निर्माण झाले असून येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांच्या अंगावर घाण पाणी उडत आहे. त्यामुळे ग्रामस्थ नाराजी व्यक्त करीत आहेत. तसेच वाहन धारकांना पाण्यातून वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे. या पाण्याचा निचरा करण्यात यावा, अशी मागणी भाजपचे तालुका सचिव जालमसिंग ठाकूर यांनी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...