आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आदिवासींची मांडली समस्या:राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची खासदार प्रतापराव जाधव यांनी घेतली भेट

बुलडाणा8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आदिवासी समाजातील कुपोषणाच्या समस्येसह बुलडाणा जिल्ह्यातील विविध समस्यांबाबत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन केंद्रीय ग्रामविकास समितीचे अध्यक्ष खासदार प्रतापराव जाधव यांनी चर्चा केली.आज केंद्रीय ग्रामविकास समितीचे अध्यक्ष खासदार प्रतापराव जाधव यांच्या नेतृत्वात राज्यातील शिवसेना खासदारांनी राष्ट्रपती भवन येथे जाऊन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. त्या भेटीदरम्यान त्यांनी आदिवासी समाजातील लहान बालकांच्या कुपोषण समस्येकडे लक्ष वेधले. या समाजाच्या उन्नतीसाठी प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. शिवाय विदर्भातील सिंचनाचा प्रश्न निकाली काढण्याच्या दृष्टिकोनातून वैनगंगा ते नळगंगा नदीजोड प्रकल्प पूर्ण होणे गरजेचे आहे.

या प्रकल्पाचा विस्तार पैनगंगेपर्यंत झाल्यास बुलडाणा जिल्ह्यासह वाशीम, यवतमाळ, वर्धा या जिल्ह्यातील शेती सुद्धा सिंचनाखाली येणार आहे.या प्रकल्प पूर्णत्वास जाण्याच्या दृष्टीने काम होणे गरजेचे आहे. बुलडाणा जिल्ह्यातील सिंचनाचा दृष्टीने अत्यंत महत्वाचा असणारा जिगाव प्रकल्प सुद्धा कालबद्ध कार्यक्रमांतर्गत पूर्णत्वास जाणे सुद्धा अत्यंत महत्वाचे आहे. या सर्व शेतकरी व आदिवासी समाजाच्या हितांच्या बाबींवर खासदार प्रतापराव जाधव यांनी लक्ष वेधले. शिष्टमंडळामध्ये शिवसेनेचे गटनेते खा. राहुल शेवाळे, खा. भावना गवळी, खा. श्रीरंग बारणे, खा. हेमंत गोडसे, खा. राजेंद्र गावित, खा. सदाशिव लोखंडे, खा. धैर्यशील माने, खा. डॉ.श्रीकांत शिंदे, खा. हेमंत पाटील, खा. संजय मंडलिक यांचा समावेश होता.

बातम्या आणखी आहेत...