आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवाहन:लम्पी स्कीन रोगाबाबत निमकवळा येथे पशुधन विभागाचे प्रतिबंधात्मक शिबिर

खामगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील निमकवळा येथे लोकसहभागातून लम्पी स्कीन या रोगाबाबत मार्गदर्शन शिबिर तसेच लसीकरण शिबिर ६ सप्टेंबर रोजी घेण्यात आले. या शिबिरात खामगाव पं.स.चे पशुधन विकास अधिकारी (विस्तार) डॉ.राजेश अवताडे यांनी लम्पी स्कीन या रोगाचा इतिहास, लक्षणे, प्रसार, प्रतिबंधक उपाययोजना तसेच उपचार याविषयी विस्तृत मार्गदर्शन केले. पशुपालकांनी आपल्या मौल्यवान गोवंश व महिषी वंश या आजारापासून बाधित होऊ नये या साठी गोठ्यात गोचीड, गोमाशा मच्छर प्रतिबंधात्मक उपाययोजना करावी तसेच या रोगाने ग्रस्त जनावर आढळल्यास त्वरित पशुसंवर्धन विभाग किंवा नजिकच्या पशुवैद्यकीय दवाखाना यांना त्वरित संपर्क करण्याचे आवाहन पशुपालकांना केले.

या मार्गदर्शन शिबिर नंतर २९८ जनावरांना लम्पी रोग प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले आहे. पशुसंवर्धन विभागाच्या लसीकरण चमू मधे डॉ.राजेश अवताडे, नारायण राऊत, सुनील बोचरे, परमेश्वर शेगोकर, उमेश पवार यांनी सहभाग घेतला. शिबिरासाठी प्रतापसिंग इंगळे, ग्रामसचिव अनंता हिरडकर व परिचर व्ही.एम. चव्हाण यांनी सहकार्य केले. या शिबिराला निमकवळा येथील पशुपालक बाबूसिंग राठोड, प्रतापसिंग इंगळे, निवृत्ती वाघमारे, सहदेव भोसले, अंबादास उंबरकर, संदीप सुरडकर, राजेंद्र इंगळे, प्रदीप इंगळे, सोपान बेलोकार, गणेश सिसोदे, रतन इंगळे, गोकुळसिंग इंगळे, विठ्ठल भारसाकडे, सदाशिव भारताकडे, गणेश सिसोदे, सदा शेलकर, अनंता वाघमारे, नारायण वाघदाने, विलास इंगळे, पिंटू उंबरकर, शिवा इंगळे, महादेव चीम, शैलेश इंगळे, शेषराव पाटील तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...