आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविद्यार्थी व शिक्षकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा, अध्ययन व अध्यापन सुखकर व्हावे, जागतिक स्तरावर स्पर्धेसाठी विद्यार्थी तयार व्हावे, या उद्देशाने जिल्हा परिषद शिक्षण विभाग बुलडाणा, जिल्हा विज्ञान प्रदर्शन नियोजन समिती, जिल्हा सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था, बुलडाणा व श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक व बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारी या कालावधीत राजीव गांधी मिलिटरी स्कूल कोलवड येथे घेण्यात आले.
या विज्ञान प्रदर्शनातील क्रमांक प्राप्त उपकरणांचा, शैक्षणिक साहित्य निर्मिती तसेच विविध स्पर्धेचे बक्षीस वितरण शिक्षण उपसंचालक अमरावती विभाग शिवलिंग पटवे, शिक्षणाधिकारी माध्यमिक प्रकाश मुकुंद, गटशिक्षणाधिकारी डी.डी.वायाळ, पडघान, संस्था अध्यक्ष विश्वनाथ माळी, डॉ.अभिलाष माळी, कमांडंट अशोक पवार, विस्तार अधिकारी संजय पवार यांच्या हस्ते पार पडले. उपकरण निर्मिती माध्यमिक विभाग प्रथम क्रमांक शारदा ज्ञानपीठ,बुलडाणा पार्थ सतीश पाटील, संताजी कॉन्व्हेंट मेहकर द्वितीय क्रमांक सर्वोदय मोहरील, तृतीय क्रमांक महेक शेख नॅशनल उर्दू हायस्कूल रोहिणखेड, प्राथमिक विभाग प्रथम क्रमांक साक्षी ज्ञानेश्वर बलाशे जि. प. शाळा येरळी ता.नांदुरा, द्वितीय क्रमांक अरविंद समाधान ताठे जीवन विकास विद्यालय दुसरबीड, शारदा ज्ञानपीठ बुलडाणा तृतीय क्रमांक धनंजय थोरात यांना देण्यात आला.
उपकरण निर्मिती माध्यमिक विभाग (शिक्षक) प्रथम क्रमांक डी.यु.हिवाळे राजीव गांधी मिलिटरी स्कूल, द्वितीय क्रमांक मनोज रमेश चिमणपुरे नवजीवन विद्यालय रोहिणखेड तर तृतीय क्रमांक एल.आर.जावळे जि.प.शाळा पिंपळगाव काळे. प्राथमिक विभाग (शिक्षक) प्रथम क्रमांक संदीप कृष्णा जाधव नगर परिषद शाळा क्रमांक एक लोणार, द्वितीय क्रमांक सीमा शिवशंकर गोरे जिल्हा परिषद शाळा बोराखेडी, तृतीय क्रमांक, पी.पी.शिंदे सरस्वती विद्यालय जानेफळ.
प्रयोगशाळा परिचारक प्रथम क्रमांक अस्लम खान फकृदिन अली उर्दू विद्यालय डोणगाव, द्वितीय क्रमांक पी. डी. सुरगडे नवनाथ विद्यालय गुम्मी, तृतीय क्रमांक बबन मुंडे दीनदयाल विद्यालय देऊळगाव राजा यांचे आले आहे. या सर्वांना मान्यवरांना हस्ते प्रमाणपत्र व स्मृती चिन्ह देऊन गौरविण्यात आले आहे. या कार्यक्रमाला जिल्हयातील विज्ञान शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. यशस्वितेसाठी राजीव गांधी मिलिटरी स्कूलचे प्राचार्य रवींद्र पडघान, यांनी सहकार्य केले. संचालन जी.एस.पवार यांनी तर आभार नीलेश चिंचोले यांनी मानले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.