आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विविध कार्यक्रम‎:सावित्रीमाई फुले जयंतीनिमित्त‎ शोभायात्रा, दशरात्रोत्सवास सुरुवात‎

मोताळा‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बोराखेडी येथील के.बी.जे.‎ विद्यालयात दरवर्षीप्रमाणे ३ जानेवारी‎ ते १२ जानेवारी दरम्यान‎ दशरात्रोत्सवाचे आयोजन करण्यात ‎केले जाते. याची सुरुवात आज ३‎ जानेवारीला सावित्रीबाई फुले यांच्या‎ जयंतीला शोभायात्रा काढून‎ करण्यात आली.‎ शोभायात्रेला के.बी.जे. नॉलेज‎ हब विद्यालयाच्या प्राचार्या‎ डॉ.विजयालक्ष्मी वानखेडे,‎ बोराखेडी सरपंच आशा तेलंग यांनी‎ हिरवी झेंडा दाखवीत शोभायात्रेला‎ सुरुवात करण्यात आली. या रॅलीत‎विविध महापुरुषांच्या वेशभूषेत‎ एकात्मतेचा संदेश देण्यात‎ आला.

याशिवाय रॅलीत विद्यार्थ्यांनी‎ पथनाट्यातून व्यसनमुक्तीचा संदेश‎ दिला आहे. रॅली बसस्थानक‎ चौकात आल्यावर डॉ.रवींद्र‎ महाजन, तेजराव पाटील, मिलींद‎ अहिरे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या‎ प्रतिमेचे पूजन केले. त्यानंतर‎ शाळेच्या प्रांगणात रॅलीची सांगता‎ करण्यात आली. यावेळी प्राचार्या‎ विजयालक्ष्मी वानखेडे यांनी‎ सावित्रीबाई फुले यांच्या सामाजिक‎ कार्यावर प्रकाश टाकत विद्यार्थ्यांना‎ माहिती दिली. सदर रॅलीत शिक्षक‎ रविकिरण वानखेडे, उपप्राचार्य नरेश‎ नारखेडे यांच्यासह प्रकाश राऊत,‎ अनिल रिंढे, विलास सपकाळ, ए.‎ ई.पाटील यांच्यासह शिक्षक वृंद‎ यांची उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...