आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासुंदरखेड येथील नालंदा वाचनालयात सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त मंगळवारी कार्यक्रम पार पडला. सुरुवातीला उपस्थितांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी आशा नंदवे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्याची माहिती दिली. सावित्रीबाईंनी आपल्यासाठी शिक्षणाची दारे खुली केली, असे त्यांनी सांिगतले.
प्रत्येक महिलेने आपल्या मुलांना शिकवून स्वत:च्या पायावर उभे करावे, जेणेकरून आपला आणि समाजाचा उद्धार करेल, असे त्या म्हणाल्या. यावेळी आशा वाकोडे म्हणाल्या की, सावित्रीबाई सुरुवातीला निरक्षर होत्या. मात्र, त्यांच्याकडे चिकाटी आणि जिद्द होती. कोणाचीही पर्वा न करता त्यांनी महात्मा फुलेंकडून शिक्षण घेऊन नंतर इतर मुलींना शिकवले. इतरांकडून त्रास झाला तरी त्यांनी पर्वा केली नाही, म्हणून त्या आज आपल्या आदर्श आहेत. प्रास्ताविक, सूत्रसंचालन आशा वानखडे यांनी केले. सुभद्रा जाधव, अभिलाषा बनसोड, छाया सरदार, शालिनी हिवाळे आदींची उपस्थिती होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.