आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन:वामनदादा कर्डक जन्मशताब्दी महोत्सवानिमित्त कार्यक्रम

खामगाव3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाकवी वामनदादा कर्डक यांच्या जन्मशताब्दी महोत्सवा निमित्त तालुक्यातील लोखंडा येथे २२ ऑगस्ट रोजी प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला उद्घाटक म्हणुन माजी आमदार नाना कोकरे, तर प्रमूख अतिथी म्हणून प्रदीप अंभोरे, बाबुराव सरदार, शाहीर डी. आर. इंगळे, एम टी इंगळे, अंबादास वानखडे, ठाणेदार गजानन वाघ, प्रकाश दांडगे, रमेश डोंगरे, मायाताई दामोदर, विशाखाताई सावंग, उर्मिलाताई ढाकरे, डॉ. पांडुरंग हटकर, गायक वैभव खुने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उद्योजक गौतम गवई यांनी केले.

या कार्यक्रमाला जोगेंद्र हिवराळे, रवि हिवराळे, बबलू भटकर, मनोज हेलोडे यांचा सहभाग होता. कार्यक्रमासाठी गजानन लोखंडकार, श्रीकृष्ण ठाकरे, तेजेंद्रसिंग चव्हाण, विलास भागवत यांचे योगदान मिळाले. यावेळी कलावंत देवा अंभोरे, धम्मानंद सिरसाट, सपना खरात, महेंद्र सावंग यांनी भीम बुद्ध यांची प्रबोधनात्मक गीते सादर केली. कार्यक्रमाला नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...