आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुटखा पकडला:वाहनासह 11 लाख 66 हजारांचा प्रतिबंधित गुटखा पकडला

बुलडाणा6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मागील काही वर्षापासुन राज्यात गुटखा बंदी असताना देखील गुटख्याची अवैध तस्करी केली जात आहे. दरम्यान, बुधवारी दि. २३ रोजी रात्री स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मलकापूर रोडवरील आरटीओ कार्यालयाजवळ जवळ मालवाहू वाहन पकडून त्यातील प्रतिबंधित गुटखा व वाहन असा एकुण ११ लाख ६६ हजार रुपयांचा जप्त केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी चिखली येथील गुटखा तस्कर निसार हाजीसह वाहन चालका विरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मलकापूर मार्गाने एका वाहनाने शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा बुलडाण्याच्या दिशेने येत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. या माहितीवरून पथकाने आरटीओ कार्यालयाजवळ सापळा रचला. काही वेळानंतर मलकापुरकडून येत असलेल्या मालवाहू वाहनाची पोलिसांनी झडती घेतली असता, त्यामध्ये राज निवास सुगंधित पान मसाला व जाफराणी जर्दाचे पोते कॅरेट खाली मिळून आले. पोलिसांनी हे वाहन ताब्यात घेऊन शहर पोलिस ठाण्यात आणले. त्यानंतर पोलिसांनी आरोपी शेख सलीम शेख इस्माईल वय ५४ व हाजी निसार दोघे राहणार चिखली यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत वाहनासह एकूण ११ लाख ६६ हजार ३२८ रुपयांचा माल जप्त केला आहे.

बातम्या आणखी आहेत...