आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर वसुलीचे‎ आव्हान:थकीत मालमत्ता कराचा भरणा न‎ केल्याने मालमत्तेला केले सील‎

अकोला‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

थकीत मालमत्ता कराचा भरणा न‎ केल्याने महापालिका मालमत्ता कर‎ विभागाने महापालिकेच्या उत्तर झोन‎ मध्ये एका मालमत्तेला सील लावण्यात‎ आले. दरम्यान थकीत कराचा भरणा‎ नागरिकांनी करावा, असे आवाहन‎ प्रशासनाने केले आहे.‎ महापालिकेसमोर आर्थिक वर्ष‎ संपुष्टात येत असताना महापालिकेला‎ कोट्यवधी रुपयाच्या कर वसुलीचे‎ आव्हान उभे ठाकले आहे. त्यामुळे‎ महापालिकेने थकीत तसेच चालु‎ आर्थिक वर्षातील मालमत्ता कर‎ वसुलीकडे लक्ष केंद्रित केले आहे.‎

यासाठीच थकीत कराचा भरणा न‎ करणाऱ्या मालमत्ता धारकांच्या‎ मालमत्तेला सिल लावण्याची कारवाई‎ मोठ्या प्रमाणात सुरु आहे. उत्‍तर‎ क्षेत्रातील सिटी कोतवाली जवळ, गांधी‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ रोड येथील वार्ड क्रं. सी-१ मालमत्‍ता‎ क्रं. ७४२ धारक सुरेश व संतोष‎ गणपतलाल अग्रवाल यांचे कडे सन‎ २०१७-१८ ते सन २०२२-२३ पर्यंतचा १‎ लाख ८१ हजार ९८१ रुपये मालमत्ता कर‎ थकीत होता. थकीत मालमत्ता कराचा‎ भरणा करण्याबाबत वारंवार सुचना‎ करुनही थकीत मालमत्ता कराचा भरणा‎ न केल्याने अखेर त्यांच्या मालमत्तेला‎ सिल लावण्यात आले.

ही कारवाई‎ आयुक्‍त तथा प्रशासक कविता व्दिवेदी‎ यांच्‍या आदेशान्‍वये आणि कर‎ अधिक्षक विजय पारतवार यांच्‍या‎ मार्गदर्शनाखाली क्षेत्रीय अधिकारी‎ विठ्ठल देवकते, सहा.कर अधीक्षक‎ हेमंत शेळवणे, दिलावार खां युसुफ खां‎ दर्रानी, अविनाश वासनिक, नारायण‎ साखरे, चंदु मुळे, सुरक्षा रक्षक कल्‍पना‎ उपरवट आदीनी केली. थकीत‎ मालमत्ता करावर दरमहा दोन टक्के‎ यानुसार व्याज आकारले जाते. त्यामुळे‎ ज्या नागरिकांकडे मालमत्ता कर थकीत‎ आहे. त्या नागरिकांनी आपल्या थकीत‎ कराचा भरणा करुन जप्तीची अप्रिय‎ कारवाई टाळावी, असे आवाहन‎ महापालिका प्रशासनाने केले आहे.‎

बातम्या आणखी आहेत...