आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापेट्रोल, डिझेल, एलपीजी गॅस, खाद्यतेल व जीवनावश्यक वस्तूंची दरवाढ व महागाईमुळे सर्वसामान्य जनता मेटाकुटीस आली आहे. केंद्रातील मोदी सरकार खुलेआम जनतेची लुट करत आहे. या महागाईच्या निषेधार्थ व केंद्रातील भाजपच्या मोदी सरकारच्या विरोधात शुक्रवारी जिल्ह्यात विविध ठिकाणी काँग्रेसच्या वतीने आंदोलन केले.
शहरात आज काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी कॉग्रेस कार्यकर्त्यांनी केंद्रातील भाजप सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करीत तहसीलदार यांना निवेदन देवुन निषेध करण्यात आला.वाढत्या महागाई संदर्भात मोदी सरकारच्या विरोधात बैल गाडीवर दुचाकीची प्रेत यात्रा काढून पेट्रोल, डिझेल दरवाढीकडे लक्ष वेधण्यात आले. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्रातील भाजपचे सरकार सातत्याने महागाईत वाढ करून सामान्य जनतेची लुट करत आहे. पेट्रोल, डिझेल, एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती गगनाला भिडल्या आहेत, एलपीजी गॅस सिलिंडर एक हजार रूपयाच्या वर गेला आहे. यासोबतच सीएनजी, पीएनजी गॅसही महाग केला आहे. खाद्यतेल व इतर जीवनावश्यक वस्तूंच्या दरातही मोठया प्रमाणात वाढ झाल्याने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील झाले आहे. त्यामुळे महागाई कमी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
या आंदोलनात काँग्रेसचे तालुका अध्यक्ष समाधान सुपेकर, सहकार सेलचे जिल्हाध्यक्ष दीपक देशमाने, डॉ. मोहंमद इसरार, महिला काँग्रेसच्या अध्यक्षा संगीता गाडेकर, शहर अध्यक्षा विद्याताई देशमाने, युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष पप्पू जागृत, सचिन बोंद्रे, कुणाल बोंद्रे, ज्ञानेश्वर सुरूशे, राम डहाके, गटनेते आसिफ भाई, हाजी रउफभाई, दीपक खरात, गोपाल देव्हडे, विजय गाडेकर, दीपक थोरात, राजू रज्जाक, गोकुळ शिंगणे, नीलेश अंजनकर, अमिनखॉ उस्मान खॉ, भाई प्रदीप अंभोरे, किशोर कदम, प्रदीप पचेरवाल, दिलीप पाटील, ईश्वर इंगळे, आत्माराम देशमाने यांच्यासह असंख्य काँग्रेस कार्यकर्ते सहभागी झाले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.