आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निषेध:राज्यपाल कोश्यारी, भाजप प्रवक्ते त्रिवेदी यांचा निषेध

खामगाव8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

छत्रपती शिवरायांबद्दल राज्यपाल भगतसिंग कोश्यारी व भाजप प्रवक्ते त्रिवेदी यांनी अवमानजनक वक्तव्य केले आहे. वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या राज्यपाल कोश्यारी व भाजप प्रवक्ते त्रिवेदी यांनी माफी मागावी अन्यथा काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महादेव वानखडे यांनी दिला.

काँग्रेसच्या वतीने मंगळवारी माजी आमदार दिलीप सानंदा यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवरायांचा, थोर महापुरुषांचा अवमान करणाऱ्या राज्यपाल भगतसिंग कोश्यारी तसेच भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांचा निषेध करण्यासाठी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.

यावेळी सरस्वती खासने, सुरजीतकौर सलुजा, भारती पाटील, सीमा ठाकरे, शारदा शर्मा, विश्वपालसिंह जाधव, बाजार समितीचे प्रशासक डॉ. सदानंद धनोकार, किशोर भोसले, मनीष देशमुख, एजाज देशमुख, मो. वसीमोद्दीन, गब्बरभाई, परवेजखान पठाण, प्रमोद महाजन, नीलेश देशमुख, निखिल देशमुख, पिंटू मोरे, सुरेश बोरकर, पुंडलिक ढेंगे, जसवंतसिंग शिख, राजेश जोशी, कृष्णा नाटेकर, अरुणसिंग बोराडे, मंगलसिंग जाधव, पुरुषोत्तम घोडके, सुमित फाळके, संतोष ढगे, वासुदेव कानकिरड, सतीश तायडे, शिवाजी बोदडे, मो. वसीमोदद्ीन, हाफीज, तेहसीन शाह, आबीद उलहक आदी सहभागी झाले होते.

बातम्या आणखी आहेत...