आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोर्चा:बससेवा सुरळीत करण्यासाठी पँथर स्टुडंट फेडरेशनचा आक्रोश मोर्चा

खामगाव7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणासाठी शहरात येतात. या विद्यार्थ्यांना शाळेत वेळेवर येण्यासाठी ग्रामीण भागातील बससेवा सुरळीत करण्यात यावी, या मागणीसाठी पँथर स्टुडंट फेडरेशनच्या वतीने सोमवारी आक्रोश मोर्चा काढण्यात येवून आगार प्रमुखांना निवेदन देण्यात आले.तालुक्यातील बहुतांश भागात शाळा, कॉलेज उपलब्ध नसल्याने तालुक्यातील विद्यार्थी शिक्षणासाठी शहरात येतात.

गावापासून ते खामगावपर्यंत एसटीने प्रवास करताना विद्यार्थ्यांना सोयीस्कर बसेस उपलब्ध नाहीत. तसेच मागील काही दिवसांपासून ग्रामीण भागात येणाऱ्या बस सुरळीत सुरू नसल्याने विद्यार्थ्यांना शाळा, कॉलेजमध्ये वेळेवर उपस्थित होण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे शिक्षणावर परिणाम होत आहे. तरी आगार प्रमुखांनी याकडे लक्ष देवून ग्रामीण भागातील बस सेवा वेळेवर सुरू कराव्यात, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदनावर जिल्हाध्यक्ष बंटी गावंडे, अजय सारसर, सुमीत सावंत, भूषण सावदेकर, मंगेश बोरुडे, अभिषेक तायडे, आदींच्या सह्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...