आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

असहकार धरणे:खामगावात विमा प्रतिनिधींचे आंदोलन ; पॉलिसी कर्जावरील व्याज दर कमी करण्याची मागणी

खामगाव23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय आयुर्विमा महामंडळातील विमा अभिकर्त्यांच्या असहकार आंदोलनाला खामगाव येथील भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या शाखेसमोर १ सप्टेंबरपासून सुरुवात झाली असून, सोमवारी काम बंद आंदोलन करण्यात आले.भारतीय आयुर्विमा महामंडळ अभिकर्त्यांच्या हिताचे निर्णय घेण्यात येत नसून त्यांना देशोधडी लावण्याचे काम सुरू आहे. पॉलिसीधारकांचा बोनस वाढला पाहिजे, पॉलिसी कर्जावरील व्याज दर कमी करावे, हप्त्यावरील जीएसटी मागे घेऊन विमा अभिकर्त्यांच्या ग्रॅज्युटीत वाढ करावी, विमा प्रतिनिधींना भविष्य निर्वाह निधी देण्यात यावा, अभिकर्त्यांसाठी वेल्फेअर फंड तयार करावा, अभिकर्त्यांना मेडिक्लेमचा लाभ तसेच पेन्शन देण्यात यावी, यासह इतर मागण्यांसाठी अभिकर्त्यांच्या वतीने आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात विभागीय अध्यक्ष राजेंद्रसिंह राजपूत, शरद पुरोहित, गणेश खेडकर, अनंत बोरसे, श्याम छगाणी, अजय भाटिया, संतोष नाडे, जया गांधी, सुनील डांगे आदींनी सहभाग घेतला.

बातम्या आणखी आहेत...