आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकेंद्र सरकारने तत्काळ विदर्भ राज्याची निर्मीती करावी, राज्य शासनाने केलेली वीज दरवाढ तत्काळ मागे घ्यावी, विदर्भातील अकराही जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहिर करण्यात यावा यांसह इतर मागण्यांसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने शुक्रवार, ११ नोव्हेंबर रोजी येथील गांधी भवनासमोर आंदोलन करण्यात आले.
विदर्भ राज्य आंदोलन समितीचे जिल्हाध्यक्ष ॲड. सुरेश वानखेडे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. मागील कित्येक वर्षापासून स्वंतत्र विदर्भ राज्याची मागणी करण्यात येत आहे. परंतु या मागणीकडे केंद्र सरकार हेतूपुरस्सर दुर्लक्ष करत आहेत. ऑक्टोबर महिन्यात झालेल्या परतीच्या पावसाने शेती पिकांचे अतोनात नुकसान करून शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला. त्यामुळे विदर्भातील शेतकरी अडचणीत सापडला आहे. या अडचणीतून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी विदर्भातील अकराही जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहिर करण्यात यावा.
तसेच मागील काही दिवसापासुन महागाईने कळस गाठला आहे. सर्वच वस्तुचे भाव गगनाला भिडल्याने सर्व सामान्यांना जीवन जगणे कठीण झाले आहे. त्यातच शासनाने वीज दरवाढ करून गोरगरिबांच्या जखमेवर मिठ चोळले आहे. त्यामुळे केलेली दरवाढ मागे घेवुन स्वंतत्र विदर्भ राज्याची निर्मीती करण्यात यावी. त्यासोबतच खासदार प्रतापराव जाधव यांनी आपला राजीनामा लोकसभा अध्यक्षाकडे पाठवावा, अशी मागणी केली. खासदार व त्यांचा पक्ष विरोधी बाकावर आहे. लोकशाहीत विरोधी पक्षाची भुमीका ही निंदकाचे घर असावे शेजारी ही आहे. परंतु आपण व आपल्या पक्षाने विदर्भ राज्य निर्मितीच्या विषयावर जाहिर भुमिका स्पष्ट केली नाही. आपण सांसदीय आयुध वापरून सरकारला सळो की पळो करून सोडण्यात आपण व आपला पक्ष अपयशी ठरला
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.