आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन:विदर्भ राज्य समितीचे आज आंदोलन

मेहकर5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्र सरकारने स्वतंत्र विदर्भ राज्य तात्काळ निर्माण करून राज्य सरकारने केलेली वीज दरवाढ तात्काळ मागे घ्यावी, विदर्भातील अकराही जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, यांसह इतर मागण्यांसाठी विदर्भ आंदोलन समितीच्या वतीने शुक्रवार, ११ नोव्हेंबर रोजी बुलडाणा येथे आंदोलन करण्यात येणार आहे.

विदर्भ राज्य आंदोलन समितीचे जिल्हाध्यक्ष ॲड. सुरेश वानखेडे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात येणार असून, समितीचे कार्यकर्ते बुलडाणा येथील खासदारकार्यालयासमोर घोषणा देत राजीनामा मागणार आहेत. गांधी भवन येथे आयोजित आंदोलनात कार्यकर्त्यांनी बहुसंख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन ॲड. सुरेश वानखेडे यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...