आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवेदन:‘त्या’ घटनेचा चर्मकार महासंघाच्या वतीने निषेध; आरोपीस अटक करण्याची मागणी

बुलडाणाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव खान्देश येथील कळमसरा येथील अल्पवयीन मुलीचे अपहरण करत सामूहिक लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली होती. या घटनेतील नराधमास अटक करण्याच्या मागणीचे निवेदन राष्ट्रीय चर्मकार महासंघ बुलडाणा जिल्हा शाखेच्या वतीने जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या मार्फत मुख्यमंत्री ठाकरे यांना २४ मे रोजी निवेदन देऊन निषेध नोंदवण्यात आला.

राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव घोलप यांच्या आदेशानुसार सदरील घटना निंदनीय व धक्कादायक असून स्थानिक पोलिसांनी काही आरोपींना अटक केली असून उर्वरित आरोपींना त्वरित अटक करून त्यांच्यावर कठोर गुन्हे दाखल करुन खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात यावा व पीडितेस लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा. यासोबतच पीडित व पीडितेच्या कुटुंबास संरक्षण व शासकीय मदत त्वरित देण्यात यावी, अशी मागणीचे निवेदन यावेळी देण्यात आले.

निवेदन देताना राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राज्य उपाध्यक्ष दादासाहेब काटकर, अमरावती विभागीय अध्यक्ष प्रा.डी.आर.माळी, जिल्हाध्यक्ष ज्ञानदेव इंगळे, भागवत तांदळे, जिल्हा उपाध्यक्ष डॉ.जी.एस.चिम, जिल्हा सल्लागार अ‍ॅड.रवींद्र काकडे, अ‍ॅड.गजानन पद्मने, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख तुळशीराम परमेश्वर, जिल्हा संघटक रामदास पिंजरकर, जिल्हा कार्यकारिणी सदस्य शा.पां.गवई, विवाह मंडळाचे जिल्हाध्यक्ष प्रा.गजानन दांडगे, युवा आघाडी जिल्हाध्यक्ष शंकर तांदळे, कार्याध्यक्ष किशोर गणबास, तालुकाध्यक्ष श्रीकृष्ण पानझाडे, तालुका सचिव संजय सुरडकर, माया भिकाजी पद्मने, बी.एस. पद्मने, गणेश आकसे, अंबादास इंगळे, काशीराम डांगे आदी पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...