आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निधी वाटप:विकासकामांसाठी उदयनगर ग्रा.पं.समोर मंगळवारी आंदोलन

उदयनगर25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गावातील प्रस्तावित व मंजूर असलेले विकास कामे सुरू व्हावे, यासह आदी मागण्यासाठी उदयनगर ग्रा. पं. कार्यालयासमोर मंगळवार, ६ सप्टेंबरला ग्रामस्थांच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. याबाबतचे निवेदन स्थानिक प्रशासन व जिल्हाधिकारी यांना २९ ऑगस्टला देण्यात आले आहे.

उदयनगर येथील वाॅर्ड क्र. ४ व ५ मधील दलित वस्ती अंतर्गत जि. प. ला व इतर प्रस्तावित असलेले काँक्रीट रस्ता कामाच्या प्रस्तावाला मान्यता देऊन काम सुरू करावे, अपंग बांधवांचा ५ टक्के निधी त्वरित वाटप करावा. उदय नगरातील खामगाव-जालना राष्ट्रीय महामार्गाचे प्रस्तावित चौपदरी करणाच्या प्रस्तावाला मान्यता मिळावी. उदयनगर येथे शासनाच्या वतीने मंजूर झालेल्या २ कोटी ६५ लाखांच्या पाणी-पुरवठा योजनेचे काम सुरू करावे. १५ वित्त आयोगाच्या विकास आराखड्यातील विकास कामे सुरू करावी. संजय गांधी निराधार समितीची बैठक न झाल्यामुळे अंदाजे दीड हजार प्रकरणे प्रलंबित असून समितीची बैठक घेऊन पात्र लाभार्त्यांचे प्रकरण मंजूर करून लाभ सुरू करावा, आदी मागण्यांसाठी ६ सप्टेंबरला ग्रा.पं. समोर धरणे-आंदोलन करण्यात येणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे तालुकाध्यक्ष, ग्रा. पं. सदस्य तथा संजय गांधी निराधार समिती सदस्य रफिक शेख, शिवसेना उपतालुकाप्रमुख जितू पुरोहित, प्रशांत झिने, शिवराज पाटील, राजिक खान, शेख शाहिद, गणेश भगत, समाधान दांदडे, संजय सौभागे यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...