आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन:मागण्यांसाठी विज्युक्टाचे शिक्षणाधिकारी कार्यालयावर आज धरणे आंदोलन

मेहकर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी विज्युक्टाच्या वतीने शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर शुक्रवारी, १६ डिसेंबर रोजी दुपारी एक वाजता धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

शिक्षण आणि शिक्षकांच्या न्याय मागण्यांच्या पूर्ततेबाबत महासंघाला बैठकीसाठी आमंत्रित करावे, अशी विनंती पत्रे शिक्षण विभागाला वारंवार सादर करण्यात आली आहेत. तथापि, शासनाकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्यामुळे विज्युक्टा व महासंघाने आता नाइलाजास्तव आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मागण्या दीर्घकाळापासून प्रलंबित असून त्यामुळे शिक्षक त्रस्त झाले आहेत.

१ नोव्हेंबर २००५ पूर्वी विना अनुदानित तसेच अंशत: अनुदानावरिल नियुक्त शिक्षकांना जुनी पेंशन योजना लागू करावी, १ नोव्हेंबर २००५ नंतर नियुक्त शिक्षकांना जुनी पेंशन योजना लागू करावी, शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे १०, २०, ३० वर्षाची आश्वासित प्रगती योजना शिक्षकांना त्वरीत लागू करण्यात यावी या व इतर इतर मागण्यांसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.

या आंदोलनात जास्तीत जास्त शिक्षकांनी सहभागी होण्याचे आवाहन संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रा. शिवराम बावस्कर, सचिव प्रा. किशोर काकडे, सदस्य प्रा. संजय किनगे, प्रा. रवींद्र काळे, उपाध्यक्ष प्रा. डॉ. गणेश भरगडे, प्रा.ग़जानन गाडेकर, संघटन सचिव प्रा. संजय भाकडे, कार्याध्यक्ष प्रा.रहेमान, प्रसिद्धी प्रमुख प्रा. गणेश शिंदे, सहसचिव प्रा. जी. आर. तायडे, प्रा.रवींद्र खरात, प्रा. प्रशांत खर्चे, प्रा. इरफान उल्ला खान, प्रा.राजीव देवकर, महिला प्रतिनिधी वैशाली शुक्ला आणि सर्व जिल्हा तथा तालुका पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...