आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन:राज्यपाल कोश्यारी यांच्या वक्तव्याचा ठिकठिकाणी निषेध, आंदोलन

बुलडाणा15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी चुकीचे वक्तव्य केले आहे. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत चुकीचे वक्तव्य करत आपल्या कंगाल बुद्धीचे प्रदर्शन केले असल्याचा आरोप करीत त्यांच्या विरोधात गाढवप्रतीरूप आंदोलन २० नोव्हेंबर रोजी आंदोलन करत शहर राष्ट्रवादी काँग्रेस व पदाधिकारी यांच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत अत्यंत चुकीचे वक्तव्य केल्यामुळे त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी महिला जिल्हाध्यक्ष अनुजाताई सावळे, पी.एम.जाधव, शहराध्यक्ष अनिल बावस्कर, सत्तार कुरेशी, नाजीमाताई खान, अनिल वर्मा, मनोज चंदन, सुजित देशमुख, विनोद गवई, बबलू कुरेशी, मनीष बोरकर, संदीप बोरडे, किरण चव्हाण, संतोष पवार, अतिश बिडकर, गौरी देशमुख, संभाजी पवार यांची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...