आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:भोनगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीसाठी निधी उपलब्ध करून द्या

शेगाव24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील भोनगाव येथील शिकस्त झालेल्या आरोग्य केंद्राच्या इमारतीसाठी निधी उपलब्ध करून देण्यात यावा, अशी मागणी शिवसेना शिंदे गटाचे तालुका प्रमुख रामा पाटील थारकर यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे. भोनगाव आरोग्य केंद्रांतर्गत बोंडगाव, खातखेड, कालखेड, तरोडा, सगोडा, चिंचोली, चिंचखेड ही गावे येत आहेत. विविध आजाराचे रुग्ण उपचार करण्यासाठी या आरोग्य केंद्रात येत आहेत.

परंतु मागील काही दिवसांपासून या केंद्राची इमारत शिकस्त झाली आहे. त्यातच अधिकारी व कर्मचाऱ्यांची रिक्त पदे असल्यामुळे रुग्णांना वेळेवर उपचार मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे आरोग्य केंद्रासाठी रुग्णवाहिका तसेच अधिकारी व कर्मचारी यांना निवासी वसाहत इमारत बांधकामासाठी निधी तसेच रिक्त असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या जागा भरण्यात याव्यात, अशी मागणी तालुका प्रमुख रामा पाटील थारकर यांनी जिल्हा वैद्यकीय अधिकारी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. निवेदन देताना राजू शेळके, मोहन लांजुडकर, संतोष ढगे सगोडा, श्याम इंगळे उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...