आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे मागणी:पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून मदत द्या

संग्रामपूर17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यात मागील दोन तीन दिवसांपासून वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने शेतीतील पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी आर्थीक अडचणीत सापडला आहे. शेती पीक नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी तालुका काँग्रेसच्या वतीने आज सोमवारी तहसीलदार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे

शेतकऱ्यांनी महागडे बी-बायाणे रासायनिक फवारणी केली, निंदन वखरणीसाठी खर्च केला. परंतु पिके ऐन बहरात असताना वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने सुरूवात करून दिली. निसर्गाच्या अवकृपेने होत्याचे नव्हते केले. मुसळधार पावसाने शेकडो हेक्टर क्षेत्रातील पिके पाण्याखाली गेली आहेत. मका, संत्रा, केळी व कपाशीचे पीक जमीनदोस्त झाले आहे. सततच्या पावसामुळे सोयाबीनच्या पिकाला कोंब फुटत आहेत. संत्रा, केळी या फळबागांचे सुद्धा अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे. शेतातील नुकसानीचा त्वरित पंचनामा करून पिक विमा देण्यात यावा. तसेच तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी तालुका काँग्रेसचे राजेंद्र वानखडे, माजी सभापती संतोष राजनकर, संजय ढगे, अमोल घोडेस्वार, प्रा. मोहन रौदळे, गणेश टापरे, सतीश टाकळकार, राजू राठोड यांनी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...