आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सीईओंना निवेदन:अल्पसंख्याकांना घरे द्या; उपसभापती‎ इमरान खान यांची सीईओंकडे मागणी‎

पातूर‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

यावर्षीच्या घरकुल यादीमध्ये‎ ग्रामपंचायतनिहाय अल्पसंख्यांकांची‎ घरकुले मंजूर झाली नाही. त्यामुळे‎ यावर अनेकांचे संसार उघड्यावर‎ राहतील, पाण्याने भिजतील, या‎ करता तातडीने घरकुल याद्यांना‎ मंजुरी द्यावी, अशी मागणी पंचायत‎ समितीचे उपसभापती इमरान खान‎ यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य‎ कार्यकारी अधिकारी यांना केली‎ आहे .‎ पंचायत समिती अंतर्गत ५७‎ ग्रामपंचायती आहेत. शंभरहून‎ अधिक गावं आहेत आणि शेकडो‎ अल्पसंख्यांक प्रत्येक गावात राहत‎ आहेत. प्रामुख्याने अल्पसंख्याकांना‎ पक्की घरे नाहीत, पावसामध्ये वीज,‎ वादळ वारा, या संकटांचा सामना‎ जीव मुठीत धरून त्यांना करावा‎ लागतो.

या परिस्थितीत हक्काचा‎ निवारा देणे शासनाची जबाबदारी‎ आहे, मात्र गावनिहाय ग्रामपंचायतीने‎ मागणी केल्यानंतरही‎ अल्पसंख्याकांची नावे प्रधानमंत्री‎ आवास योजनेमध्ये आली‎ नसल्यामुळे यावर्षीचा पावसाळा‎ त्यांना पक्क्या निवाऱ्याशिवाय‎ काढावा लागण्याची शक्यता‎ नाकारता येत नाही. यासंदर्भात‎ उपसभापती इम्रान खान मुमताज‎ खान यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य‎ कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार‎ यांची भेट घेऊन वास्तव परिस्थिती‎ लक्षात आणून दिली आणि‎ अल्पसंख्याकांची घरे तातडीने मंजूर‎ करावी, अशी मागणी केली.‎