आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जनजागृती‎:लठ्ठपणासंबंधीच्या आजारांबाबत‎ नाटिकेतून केली जनजागृती‎

बुलडाणा19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील ‘व्हिजन कॉलेज ऑफ नर्सिंग’‎ विद्यालयात शनिवार, ४ मार्च रोजी जागतिक लठ्ठपणा‎ दिवस साजरा करण्यात आला. यावेळी महाविद्यालयाच्या‎ प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांनी लठ्ठपणा होण्याची कारणे,‎ प्रतिबंधक उपाय आणि लठ्ठपणा संबंधीत आजाराबाबत‎ माहितीपर नाटीका नागरिकांना सादर केली. नाटिकेद्वारे‎ माध्यमातून सोप्या भाषेत सर्वसामान्यांना लठ्ठपणा होण्याची‎ कारणे नाटिकेद्वारे समजली.

नाटिकेच्या यशस्वीतेसाठी‎ प्राचार्य रोहिणी पवार, प्रा.शुभांगी आढाव व इतर शिक्षक‎ वृंदाचे मार्गदर्शन मिळाले. या उपक्रमाचे संस्थेचे अध्यक्ष‎ डॉ.दीपक लद्दड, सचिव डॉ.संगीता लद्दड, सहसचिव रवींद्र‎ लद्दड, कोषाध्यक्ष अर्चना लद्दड यांनी कौतुक केले.‎

बातम्या आणखी आहेत...