आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाविकांना महाप्रसाद:पुरी, चटणीच्या महाप्रसादाची शतकी परंपरा कायम

साखरखेर्डा7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथून अवघ्या काही अंतरावर असलेल्या श्री क्षेत्र रानअंत्री येथे सद्गूगूरु परमानंद नारायण सरस्वती स्वामी महाराज यांच्या ११२ व्या संजीवन समाधी सोहळ्याला रविवारपासून भागवताचार्य, रामायणाचार्य आनंदमूर्ती रामदासजी महाराज यांच्या अध्यक्षतेखाली सुरूवात करण्यात आली. दुपारी किशोर महाराज थिगळे यांचे प्रवचन तर रात्री रामदास महाराज यांचे कीर्तन पार पडले. दुसऱ्या दिवशी सोमवारी पाच क्विंटल चटणी आणि दहा क्विंटल पुरीच्या महाप्रसादाचे भाविकांना वितरण करण्यात आले.चिखली तालुक्यातील रानअंत्री येथे दरवर्षी यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते.

यात्रेत येणाऱ्या भाविकांना महाप्रसाद म्हणून पुरी व चटणीचे वाटप करण्यात येते. ११२ वर्षांची या चटणी, पुरी महाप्रसादाची परंपरा आजही कायम आहे. सद्गूगूरु परमानंद नारायण सरस्वती स्वामी महाराज यांचा महाराष्ट्रासह, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, राजस्थान यासह इतर राज्यात मोठा भक्त परिवार आहे. सुप्रसिद्ध गायक अजित कडकडे, अनाडीफेम अभिनेते व्यंकटेश हे नेहमीच या ठिकाणी हजेरी लावतात. गतवर्षी कोरोनाच्या टाळेबंदीतही यात्रा भरली नसली तरीही चटणी आणि पुरीचा महाप्रसादाच्या परंपरेत खंड पडला नव्हता.

पुरीसोबत चटणीच का
शंभर वर्षांपूर्वी येथे महाराजांच्या दर्शनासाठी परप्रांतातून भाविक येथे येत होते. त्यावेळी त्यांना घरी पोहोचण्यासाठी दीर्घ काळ लागत होता. परिणामी महाराजांनी दिलेला प्रसाद शिळा होत होता. त्यामुळे भाविकांना घरी गेल्यावर आपल्या परिवाराला प्रसाद देता यावा, यासाठी चटणी आणि पुरीच्या महाप्रसादाची परंपरा सुरू करण्यात आली असून ती आजपर्यंत कायम ठेवण्यात आली आहे. -गजानन झाल्टे गुरुजी, विश्वस्त, रानअंत्री

बातम्या आणखी आहेत...