आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Akola
  • Buldhana
  • Quarrels Broke Out In Villages, Illegal Businesses Flourished; ​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​ | Marathi News

कायदा व सुव्यवस्था:गावागावात भांडण तंटे, अवैध धंदे फोफावले ; ​​​​​​​तंटामुक्त गाव समित्यांच्या सक्षमीकरणाची गरज

खामगाव25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यात ९७ ग्रामपंचायत स्तरावर तंटामुक्त समित्या निर्माण करण्यात आल्या. परंतु या समित्यांचे कार्य ढेपाळल्यामुळे गावागावात भांडणे तंटे व अवैध धंदे फोफावले असल्याची आहेत. सण, उत्सवाचे दिवस पाहता या समित्यांचे सक्षमीकरण करण्याची गरज आज निर्माण झाली आहे.गावागावातील भांडण तंट्यांचा निपटारा गावातच व्हावा, गावातील लोकांना पोलिस स्टेशनपर्यंत तसेच न्यायालयाची पायरी चढण्याची वेळ येऊ नये, पोलिस यंत्रणेवरील कामाचा ताण कमी होऊन गावातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी तालुक्‍यातील ९७ ग्रामपंचायत स्तरावर तंटामुक्त समित्यांची स्थापना केली आहे. परंतु सद्यस्थितीत या समितीमधील लोकांचा उत्साह कमी झाल्याचे चित्र प्रत्येक गावात पाहावयास मिळत आहे. तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी १५ ऑगस्ट २००७ मध्ये महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान सुरू केले होते. या अभियानात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गावांना सरकारने पुरस्कार देऊन गौरवले होते. परंतु प्रारंभीच्या काळात गावातील अवैध धंदे व भांडण तंटे बंद झाले होते. आता समित्यांमधील त्या त्या गावातील समिती सदस्यांना फारसा रस राहिलेला दिसून येत नाही. त्यामुळे अवैध व्यवसायाबरोबरच भांडण तंट्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे गावातील समित्या नाममात्र ठरत आहेत. गावागावातील वाद आता पोलिस स्टेशनपर्यंत जाऊन पोहाेचत आहे. परिणामी समित्यांच्या उद्देशालाच हरताळ फासला जात आहे. यानिमित्ताने समित्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे.

प्रशासकीय यंत्रणेचे दुर्लक्ष : आजच्या घडीला अनेक गावातील तंटामुक्त समिती ही कागदोपत्रीच दिसून येते. जी गावे तंटामुक्त झाली होती, त्याच गावातील भांडण तंटे पोलिस ठाण्यापर्यंत पाेहाेचत आहेत. त्यामुळे समित्या फक्त कागदावरच आहे. प्रत्यक्षात गावातील तंटा गावातच मिटवून पोलिस ठाण्यापर्यंत पोहाेचू नये, हा उदात्त हेतू अपयशी ठरत आहे. गावागावात प्रशासकीय यंत्रणेच्या दुर्लक्षामुळे अवैध धंद्यात वाढ होऊन भांडणे वाढली आहे. तंटामुक्त समित्यांचे अध्यक्ष, सदस्य हे काही गावात नावापुरतेच आहे. त्यांच्या जागी नव्या चेहऱ्यांना संधी देऊन तंटामुक्त समितीची फेररचना करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर रिक्त असलेल्या जागा त्वरित भरून समितीला बळकटी द्यावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

बातम्या आणखी आहेत...