आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजप व प्रहारची मागणी:शहरातील अतिक्रमणधारकांना घरकुलांचा त्वरीत लाभ द्या

मलकापूर6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील चाळीस बिघा परिसरात असलेल्या अतिक्रमित धारकांना घरकुल योजनेचा लाभ देवुन या परिसरातील समस्या तातडीने सोडवण्यात याव्यात, या मागणीसाठी २६ जुलै रोजी भाजप व प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने मोर्चा काढून मुख्याधिकारी यांना निवेदन दिले.

पालिकेच्या हद्दीत येत असलेला चाळीस बिघा परिसरात अनेक नागरिक अतिक्रमित जागेत राहत आहेत. त्या नागरिकांना शासनाच्या घरकुल योजनेचा लाभ मिळणे गरजेचे आहे. मात्र त्यांना घरकुल योजनेचा कुठलाही लाभ अद्यापही मिळाला नाही. त्यामुळे गरीब अतिक्रमित धारकांना शासनाच्या घरकुल योजनेचा लाभ देवून त्यांना योजनेत सामावून घेण्यात यावे. तसेच या परिसरात नागरी मुलभूत सुविधांचा अभाव प्रकर्षाने दिसून येत आहे. रस्त्यांवर बऱ्याच ठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात या खड्ड्यांत पाणी साचत असल्याने नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. पावसामुळे डासांचा प्रादुर्भाव सुध्दा वाढला आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. परंतु पालीका प्रशासन कुठलीही दखल घेत नसल्याने या परिसरातील नागरिकांनी भाजपा व प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून पालिकेवर मोर्चा काढून या परिसरातील समस्या सोडवण्यात याव्यात अशी मागणी केली.

यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपप्रमुख अजय टप, भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष नाना जोशी, शहर उपाध्यक्ष अमोल टप, मोहन पाचपांडे, आशिष माहुरकर, प्रहार तालुका प्रमुख अजित फुंदे, तालुका महिला प्रमुख शुभांगी डवले, सीमा टप, वनिता टप, दीपक चंदनकर, जितू ठोसर, वैशाली साखळीकर, चंद्रभागा ढगे, शोभा चव्हाण, संतोष जाधव, बळीराम बावस्कर, वसंता घोडके, अनिल साखळीकर, रवि वानखेडे, रूपेश श्रीमाळ, गणेश रोठे, भीमा इंगळे, विशाल उंबरकार, पिंटू मुंधोकार, देवेन टाक, कुणाल ढोलकर, सूरज उंबरकार, आशा खराटे, श्रीधर वानखेडे, दिनकर मुंधोकार, संतोष उंबरकार, सचिन बुडुकले, अशोक गाढवे, राहुल तायडे, उमेश जाधव यांच्यासह चाळीस बिघा परिसरातील महिला, पुरूष प्रामुख्याने उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...