आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेहकर:काँग्रेस सांस्कृतिक कार्यसेलच्या प्रदेश सचिवपदी रफिक कुरेशी

मेहकरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

येथील सिनेअभिनेते तथा पत्रकार रफिक कुरेशी यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सांस्कृतिक कार्य सेल चित्रपट, रंगभूमी, संगीत,नाट्य विभागाच्या प्रदेश संघटक सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र प्रदेश सांस्कृतिक कार्य सेलचे अध्यक्ष अशोक झगडे,मुख्य समन्वयक व प्रशासन अॅड. मनीष व्हटकर यांनी एका पत्रकाद्वारे केली आहे. रफिक कुरेशी हे गेल्या पंधरा ते वीस वर्षांपासून चित्रपट क्षेत्रात कार्य करत असून त्यांनी शेतकरी पुत्र” हीच बायको पाहिजे” अशी नको सुनबाई” हक ए सैलानी” सुलताने महाराष्ट्र” चिमण्या” जिगरा एक संघर्ष, आदी अनेक चित्रपटात मुख्य भूमिका केलेले आहेत. रफिक कुरेशी यांची प्रदेश संघटक सचिवपदी निवड झाल्याने प्रदेश महिला उपाध्यक्ष शोभा मोरे, नामवंत दिग्दर्शक व निर्माता आनंद शिंदे उर्फ बाबा अनेक कलावंतांनी त्याचे कौतुक केले आहे.

बातम्या आणखी आहेत...