आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजीनामा:राहुल बोंद्रे यांचा काँग्रेस जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा; ‘एक व्यक्ती एक पद’ या नियमानुसार पदत्याग

बुलडाणाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शिर्डी येथे आज झालेल्या काँग्रेसच्या चिंतन बैठकीत जिल्ह्याचे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी बुलडाणा जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. याबाबत त्यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी राजीनामा दिल्याचे मान्य केले.

उदयपूर येथे झालेल्या काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनात विविध विषयावर चर्चा झाली असताना एक व्यक्ती एक पद व पाच वर्ष पद उपभोगलेल्यांना राजीनामा देण्याचे ठरले होते. त्यानुसार महाराष्ट्रातून नागपूर ग्रामीण काँग्रेसचे अध्यक्ष राजेंद्र मुळक आणि नागपूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष विकास ठाकूर यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले. त्यानंतर आज शिर्डी येथे झालेल्या प्रदेश काँग्रेसच्या बैठकीत बुलडाणा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी सुध्दा आपल्या पदाचा राजीनामा दिला. राहुल बोंद्रे यांनी जिल्हाध्यक्ष पदावर पाच वर्षांपेक्षा अधिक काळ झाल्यामुळे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.

बातम्या आणखी आहेत...