आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खामगाव:गौतम नगर येथे जुगार अड्ड्यावर धाड; 10 हजारांचा माल जप्त

खामगाव3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव जामोद हद्दीतील गौतम नगर येथे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर अप्पर पोलिस अधीक्षक यांच्या पथकाने धाड टाकून सात जणांना ताब्यात घेतले आहे. यावेळी त्यांच्या ताब्यातून १० हजार ६४० रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई काल २९ मार्च रोजी करण्यात आली आहे. या कारवाईमुळे जुगाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

पोलिस स्टेशन जळगाव जामोद हद्दीत गौतम नगर येथील संदिप मारोती वानखडे हा जळगाव जामोद शहरासह तालुक्यात तीनशे रुपये रोजाने एजंट नेमुन जुगार खेळत असल्याची माहिती अप्पर पोलिस अधीक्षक यांना मिळाली. या माहितीवरून त्यांनी पथकाला कारवाई करण्याचे आदेश दिले. या आदेशावरून पथकाने उपरोक्त ठिकाणी जाऊन धाड टाकली असता संदीप मारोती वानखडे हा त्याच्या कार्यालयात मोबाइल फोनवर जुगार खेळत असल्याचे दिसून आले. तसेच यावेळी जुगार खेळणाऱ्या सहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

त्यांच्या ताब्यातून ९ हजार रुपये किंमतीचे ९ मोबाइल व जुगार साहित्य असा एकूण १० हजार ६४० रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पथकाचे पोलिस उपनिरिक्षक पंकज सपकाळ, पोहेकॉ गजानन बोरसे, नापोका गजानन आहेर, संदीप टाकसाळ, राम धामोडे, अनिता गायकी, निर्गुना सोनटक्के यांनी केली आहे.या प्रकरणी उपरोक्त आरोपी विरुद्ध जळगाव जामोद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

बातम्या आणखी आहेत...